रोहयोची कामे, कोरोना उपाययोजनांच्या निधीसाठी सत्तार अजित पवारांना भेटले 

सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात रोजगार हमी योजनाची कामे सुरू करावीत, अशी आग्रही मागणी सत्तार यांनी यावेळी केली.
Shivsena Minister Meet Ajit Pawar News Aurangabad
Shivsena Minister Meet Ajit Pawar News Aurangabad

औरंगाबाद ः राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध यामुळे मतदारसंघातील लोकांचा रोजगार बुडाला आहे. गरीबांच्या हाताला काम मिळावे यासाठी तातडीने रोहयोची कामे सुरू करावीत, तसेच कोरोनावरील उपया योजनांसाठीचा निधी द्यावा, अशी मागणी सत्तार यांनी अजित पवारांकडे केली. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या शिवाय कोरोनाचा मृत्यूदर देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य व गोर-गरिबांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

या पॅकेज अंतर्गत मदतीची अंमलबजावणी करण्यासाठी अजित पवार यांनी नुकतीच बैठक घेऊन निधी वितरित केला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. कोरोनाच्या संकटकाळात बेरोजगार व सामान्य माणसांच्या हाताला काम मिळावे यासाठी सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात रोजगार हमी योजनाची कामे सुरू करावीत, अशी आग्रही मागणी सत्तार यांनी यावेळी केली.

तसेच विविध विकास कामांसाठी त्यासोबतच कोरोना साथ रोगाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी देखील तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. कोरोनाचे वाढते रुग्ण व मृत्युदर शून्यावर आणून मतदारसंघात वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सत्तार यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिले. 

दरम्यान, सत्तार यांच्या मागण्यांवर आपण गांभीर्याने विचार करू, कोरोना साथ रोगा विरुद्ध लढण्यासाठी व सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी आपण कटिबद्ध असून याबाबत लवकरच निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिल्याचे सत्तार यांनी कळवले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com