निवडणुकीत भाकरी फिरवण्याची वेळ - समाधान आवताडे

तालुक्याच्या पाणीप्रश्नाबाबत गेल्या 25 वर्षापासून झुलवत ठेवल्याने तरुणांना बेरोजगार होण्याची वेळ आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवत भाकरी फिरवावी, असे आवाहन अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी भोसे येथे व्यक्त केले.
निवडणुकीत भाकरी फिरवण्याची वेळ - समाधान आवताडे

भोसे : तालुक्याच्या पाणीप्रश्नाबाबत गेल्या 25 वर्षापासून झुलवत ठेवल्याने तरुणांना बेरोजगार होण्याची वेळ आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवत भाकरी फिरवावी, असे आवाहन अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी भोसे येथे व्यक्त केले.

प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आज  मानेवाडी, हुन्नुर, लोणार, भोसे, नंदेश्वर आदी ठिकाणी प्रचार दौरा केला. त्यात ते बोलत होते. या वेळी सभापती प्रदीप खांडेकर, जि प सदस्य दिलीप चव्हाण, संचालक सचिन शिवशरण, येताळा भगत, जगु गोरड, भैरु भोसले, शंतनू भगरे कालिदास पाटील,हरी पाटील, दत्ता जमदाडे,अंकुश यादव, भारत निकम बंडू जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेदवार आवताडे म्हणाले, की तालुक्याच्या विकासासाठी आपले प्रश्न विधानसभेत मांडणारा उमेदवार असणे गरजेचे आहे. आज वयाने  ज्येष्ठ असलेल्या परिचारक यांच्या वयाचा आदर करून ते आपले प्रश्न विधानसभेत या वयात मांडू  शकणार आहेत का असा सवाल करत आणि गेली दहा वर्षे ज्यांनी आपल्याला प्रश्न मांडतो पाणी आणतो  म्हणून प्रश्न मार्गी लावले याचे चिंतन करण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्ताने आली  आहे. या दक्षिण भागातील बेरोजगार तरुण वर्गाला दिशा देण्याची हीच वेळ असलेने  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करून आपले प्रश्न या भागात फिरून आपले प्रश्न विधानसभेत मांडून मार्गी लावणारा  उमेदवार निवडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना  केले. 

भाजपने एकाच घरात दोन दोन आमदार देण्याचा घाट घातला आहे. मालकशाही यापुढे मंगळवेढा तालुक्यात स्वीकारायची नाही. तालुक्यातील भूमिपुत्रच मंगळवेढ्यातील समस्यांना वाचा फोडू शकणार असलेने समाधान आवताडे यांना विजयी करावे असे आवाहन दत्ता जमदाडे यांनी केले.  यावेळी सौदागर पाटील शंतनू भगरे  आदींनी भाषणे झाली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com