संग्राम थोपटे समर्थकांचा काँग्रेस भवनावर हल्ला

संग्राम थोपटे हे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.
sangram thopate supporter attack on congress house
sangram thopate supporter attack on congress house

पुणे: भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज पुणे काँग्रेस भवनावर हल्लाबोल केला. थोपटे समर्थकांनी जोरदार तोडफोड केली.

संग्राम थोपटे हे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. थोपटे घराणे काँग्रेसनिष्ठ असल्याने संग्राम हे खात्रीशीर मंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र काल विस्तारात संग्राम यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे कालच काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात आले होते. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठय़ा संख्येने थोपटे समर्थक काँग्रेस भवनमध्ये घुसले आणि त्यांनी तुफान तोडफोड केली. खिडक्या, काचा दगडांनी फोडण्यात आला. यावेळी संग्राम थोपटेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com