सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्याने जनता आपल्या पाठीशी - संतोष बांगर

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्याने जनता आपल्या पाठीशी - संतोष बांगर

हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघासोबत जिल्ह्यात शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याने मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी नक्‍कीच उभी राहिल, असा विश्वास शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांनी व्यक्‍त केला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात श्री. बांगर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध गावांमध्ये भेटी देवून मतदारांशी संवाद साधला. तसेच कॉर्नर बैठका घेतल्या. 

यावेळी महायुतीचे उमेदवार श्री. बांगर म्हणाले की, कळमनुरी विधानसभा मतदारसंघासोबतच जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलन करून प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने रोहित्र मिळावे यासाठी आंदोलन करून रोहित्र उपलब्ध करून देत शेती सिंचनासाठी वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवला. हमीभावाने तुरीची खरेदी सुरु व्हावी यासाठी आंदोलन देखील केले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून शिक्षकांच्या पदोन्नतीसोबत वेतनश्रेणी व इतर प्रश्नही सोडवले आहेत असे ते म्हणाले. 

ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून रस्ते दुरुस्त करून घेतले. याशिवाय काही ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवला जावा यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने पुलांची दुरुस्ती केली. विद्यार्थिनींच्या वाहतुकीसाठी मानव विकासच्या बसेस वेळेवर सोडल्या पाहिजेत यासाठी एसटी आगाराकडे पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सतत पाठपुरावा करून प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे मतदार आपल्या पाठीशी उभा राहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला जाईल. त्यामुळे मतदारांनी यावेळी विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन महायुतीचे उमेदवार श्री. बांगर यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com