पक्ष सोडून गेलेल्यांना जनताच धडा शिकवेल : शरद पवार

..
Sharad Pawar.
Sharad Pawar.

वसमत   ः ज्‍यांना पक्षाने मोठे केले तेच नेते पक्ष सोडून गेले. मात्र आगामी निवडणुकीत जनता त्‍यांना धडा शिकविल्‍याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता.१९) येथे केले.

येथील मयूर मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार पंडितराव देशमुख,आमदार रामराव वडकुते, जिल्‍हाध्यक्ष दिलीप चव्‍हाण, जिल्‍हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, आंबादास भोसले, सभापती प्रल्‍हाद राखोंडे, राजू नवघरे, रत्‍नमाला चव्‍हाण यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते.
 

यावेळी बोलताना श्री. पवार म्‍हणाले की, पक्षाने मागील पंधरा वर्षात पक्षाने ज्‍यांना मोठे केले ते पक्ष सोडून गेले. विकासकामांचे कारण सांगून पक्षांतर करणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी मंत्री असताना काय काम केले ?  फोडाफोडीचे राजकारण आपल्‍यासाठी नवीन नाही. मात्र माझा मतदारच त्‍यांचा डाव हाणून पाडल्‍याशिवाय राहणार नाही . राज्‍यातील सर्वसामान्य जनतेच्‍या भल्‍यासाठी नवीन नेतृत्‍व तयार करणे आवश्यक असून त्‍यासाठी मी  राज्यस्तरावर  दौरा करीत  आहे . 

यावेळी श्री. पवार यांनी केंद्र व राज्‍य सरकारवर कडाडून टिका केली. शेतीमालाला योग्‍य भाव नाही, दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडल्‍याने शेतकरी आत्‍महत्‍या करीत आहेत. या सरकारच्‍या काळात देशात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र व राज्‍य सरकारची आहे.

मात्र दोन्‍ही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्योजकांचे कर्ज माफ केले अन् शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. या सरकारच्‍या काळात कारखाने बंद पडले, कापड गिरण्या बंद पडल्‍या, बेरोजगारी वाढली. एकीकडे रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने बेरोजगारी वाढवून ठेवल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

आगामी निवडणुकीत जनता आपल्‍या पाठीशी असून निवडणुका होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. कुठल्‍याही परिस्‍थितीत सत्ता परिवर्तन होणार असून मतदारांनी राष्ट्रवादीच्‍या पाठीशी उभे रहावे ,असे आवाहन श्री. पवार यांनी केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com