`...तर माझेही सुशीलकुमारांसारखे झाले असते'

`...तर माझेही सुशीलकुमारांसारखे झाले असते'

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मी आता सोलापूरचा राहिलो नाही, असे म्हणाले होते. पण मी तसे म्हणणार नाही. सभागृहनेताझालो तरी, आधी मी प्रभागाचा आहे त्याचबरोबर शहराचाही आहे, अशी मार्मिक टिप्पण्णी महापालिकेचे नूतन सभागृहनेते भाजपचे श्रीनिवास करली यांनी केली.

सोलापूर - सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मी आता सोलापूरचा राहिलो नाही, असे म्हणाले होते. पण मी तसे म्हणणार नाही. सभागृहनेता झालो तरी, आधी मी प्रभागाचा आहे त्याचबरोबर शहराचाही आहे, अशी मार्मिक टिप्पण्णी महापालिकेचे नूतन सभागृहनेते भाजपचे श्रीनिवास करली यांनी केली.

विद्यमान सभागृहनेते संजय कोळी यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे श्री. करली यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. शहर भाजपचे सरचिटणीस शशीकांत थोरात, युवक आघाडीच्या शहर प्रमुख वृषाली चालुक्य यांच्या उपस्थितीत श्री. करली यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी महापौर शोभा  बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, श्री. कोळी, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर श्री. करली यांनी संवाद साधला.

श्री. करली म्हणाले,सभागृहनेता झालो तरी विकासकामांसाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करणार आहे. प्रभातील मतदारांनी मला निवडून दिले आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याला प्राधान्य असेल. त्याचबरोबर शहराच्या विकासासाठीही समन्वयाने काम करणार आहे. मी आता सभागृहनेता झाल्याने प्रभागाचा राहिलो नाही, असे कदापि म्हणणार नाही. अन्यथा माझ्यावरही श्री. शिंदे यांच्याप्रमाणे टीका होईल.

महापालिकेत कोणत्याही प्रकारची गटबाजी होणार नाही याची दक्षता घेणार आहे. शहर विकासाचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत यासाठी महापौरांशी चर्चा करून तातडीने ते प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील. विरोधी पक्षनेते महेश कोठे हे आमच्याच समाजाचे आहेत. त्यामुळे ते मला मदतच करतील. शहर विकासासाठी सर्वपक्षातील नगरसेवकांचे सहकार्य घेण्यात येईल, असेही श्री. करली म्हणाले.

सोलापूरकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याला माझे प्राधान्य असेल. तसेच स्मार्ट सिटी योजनेतून पूर्व भागात काही प्रकल्प राबवता येईल का याबाबत
नियोजन करणार आहे.
- श्रीनिवास करली, सभागृहनेता
सोलापूर महापालिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com