जावई आले अन 17 जणांना घेऊन गेले विलगीकरणात 

कोंढाळीतील एकही व्यक्ती आतापर्यत बाधित आढळला नाही. बाहेरुन आलेल्या बाधितांमुळेच कोंढाळी गाव चर्चेत राहिले आहे. नागपुरहून आलेला ऑटोचालक पॉझीटिव्ह आढळला. ही माहिती कळताच काटोल तालुका यंत्रणा ऍक्‍टिव्ह झाली आणि कारवाई सुरु केली. आधी विकासनगर परिसर सील करण्यात आला.
corona
corona

कोंढाळी (जि. नागपूर) : विकासनगर येथे आपल्या सासुरवाडीला नागपुरच्या यशोधरानगर चौकातील गरीब नवाज नगरमध्ये राहणारा जावई आला. नंतर तो कोरोनाबाधित असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे येथील 16 जणांना नागपुरला विलगीकरणात पाठवण्यात आले. यामुळे लोक चांगलेच धास्तावले असून "जावई आला अन 16 जणांना सोबत घेऊन गेला' अशी चर्चा गावात सुरु आहे. सध्या कोंढाळी सील करण्यात आले आहे. 

नागपुरहून एक ऑटोचालक आपल्या आई व पत्नी सह 28 मे च्या रात्री एक वाजता ऑटोनेच येथे आले. परिसरातील जागरुक मंडळीला माहीती मिळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीला माहिती दिली. प्राथमिक आरोग्य विभागप्रमुख डॉ. सुनील येरमल, डॉ. बिलाल पठाण, डॉ. अश्विनी दातीर यांच्यासह ठाणेदार श्‍याम गव्हाने यांनी 29 मे रोजी दुपारी ऑटो चालकासह कुटूंब, सासू सासरे अन्य दोन असे एकून सात जणांना नागपुरच्या आमदार निवास विलगीकरण केंद्रात हलविले. 

सर्वांचे लाळीचे नमुने घेतल्या नंतर 3 जूनला सकाळी अहवाल आला. त्यामध्ये ऑटोचालक पॉझीटिव्ह आढळला. ही माहिती कळताच काटोल तालुका यंत्रणा ऍक्‍टिव्ह झाली आणि कारवाई सुरु केली. आधी विकासनगर परिसर सील करण्यात आला. घटनास्थळी काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार निलेश कदम, गटविकास अधिकारी सुनील साने तसेच आरोग्य, पोलीस, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी होते. 

16 जणांची रवानगी नागपूरला 
जावई, सासरे व संपर्कातील 16 संशयितांना नागपुरला विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. डॉ. सुनील येरमल यांनी विकास नगरमधील नागरिकांना घाबरून न जाता संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घेण्याचा आवाहन ध्वनीक्षेपकावरुन केले. माहिती कळताच जिल्हा परीषद सदस्य सलील देशमुख, पंचायत समिती उपसभापती अनुराधा खराडे, सदस्य अरूण उईके, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, माजी उपसभापती अनुप खराडे, सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ठाणेदार श्‍याम गव्हाने, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चाफले, संजय राऊत, नितीन देवतळे, प्रशांत खंते, नितीन ठवळे, आकाश गजबे, ग्राम विकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांच्या उपस्थितीत बाधीत क्षेत्र सील करण्यात आले. कोंढाळीतील एकही व्यक्ती आतापर्यत बाधित आढळला नाही. बाहेरुन आलेल्या बाधितांमुळेच कोंढाळी गाव चर्चेत राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com