अपहार करणाऱ्या वाहकांवर एसटीची करडी नजर

msrtc
msrtc

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीत तिकिटांचा अपहार करणाऱ्या वाहकांची आता खैर नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात वाहक हे तिकीटांमध्ये अपहार करत असून त्याची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे.

यासाठी प्रत्येक विभागातील वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यानं असे अपहार प्रकरणे शोधून काढण्यासाठी सक्त ताकीद दिली आहे.  

राज्यातील सर्व विभागात मोठ्या प्रमाणात एसटीच्या महसुलात तूट येत आहे. त्यासाठी वाहकांकडून टिकिटाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार येत असल्याचे समोर आले. यात गेल्या काही महिन्यात लातूर, ठाणे, बुलढाणा या विभागात विविधप्रकारच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्या.

त्यात या तीन विभागाने सुरक्षा व दक्षता खात्याने कारवाई करण्याचे 50 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तर उर्वरीत विभागाने वाहकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केले असून यामुळे महामंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

आतापर्यंत  राज्यात ज्या विभागाकडून कार्यवाही करण्यास दिरंगाई करण्यात आली त्यांना आज महामंडळाने मागील तीन महिने आणि पुढील सहा अशा नऊ महिन्याचे टार्गेट दिले असून या कालावधीत या विभागांनी तब्बल 75 टक्के कारवाई करण्याचे टार्गेट पूर्ण करावे, असे निर्देश आज दिले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com