धनगर आरक्षणाची शिफारस केंद्राला पाठविणार : मुख्यमंत्री

धनगर आरक्षणाची शिफारस केंद्राला पाठविणार : मुख्यमंत्री

मुंबई : मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाच्या बाबतीतही कारवाई सुरु आहे. याआधीच्या आरक्षणात धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे. ते व्हिजेएनटीमध्ये देण्यात आले आहे. त्यांना एसटीमध्ये आरक्षण हवे आहे. हा अधिकार केंद्र शासनाला आहे. याबाबतही राज्य शिफारस योग्य ती शिफारस केंद्राला पाठवणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली. तसेच धनगरांच्या आरक्षणाचाही अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्याचे नमूद केले. त्यावर योग्य ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली., आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांची भूमिका समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी आहे, अशी टीका करुन विरोधकांकडून राज्याच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले जावेत असे आवाहनही त्यांनी केले. 

दुष्काळी स्थितीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने वेळेआधीच राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. त्यासोबतच दुष्काळी मदतीपोटी केंद्र शासनाला 7,500 कोटींचा प्रस्तावही पाठवला आहे. गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच वेगाने कारवाई झाली आहे. शासनाने दुष्काळी उपाययोजनांचे जीआर काढले आहेत, टॅंकर्सही सुरु केले आहेत. उपाययोजनांचे तीन टप्पे केले आहेत. चाऱ्यासाठी गारपेर जमिनीवर चारा लागवड करण्यात येत आहे. प्रत्येक दुष्काळी जिल्ह्यात दोन हजार एकरावर चारा लागवड केली जाईल. चारा बियाण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. शासनाने दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्व तयारी केली असताना विरोधकांनी राजकारण करु नये. दुष्काळ निवारणाकामी विरोधकांनी मोलाच्या सूचना द्याव्यात. त्यावर अंमल केला जाईल, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम करु नये असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com