सुमित खांबेकर यांना मनसेत उपाध्यक्षपदी बढती ...

सुमित खांबेकर यांना मनसेत उपाध्यक्षपदी बढती ...

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच सुहास दाशरथे व हर्षवर्धन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुमित खांबेकर यांच्याकडे असलेले शहर जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली का ? अशी चर्चा सुरू होती .परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमित खांबेकर यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदी बढती देत सर्वांनाच धक्का दिला आहे. 

शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात मोठे संघटनात्मक फेरबदल होणार याची चर्चा सुरू झाली होती. अपेक्षेप्रमाणे औरंगाबादचा दौरा आटोपून मुंबईला परतल्यानंतर काही दिवसांनी राज ठाकरे यांनी सुहास दाशरथे व हर्षवर्धन जाधव यांच्याकडे शहर व जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. 

मनसेचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू होती. पक्ष विरोधात काम करणाऱ्या किंवा प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देऊन पक्षाची बदनामी करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांची नावे आपल्याकडे असून त्यांना पक्षात ठेवायचे की नाही याचा निर्णय आपण लवकरच घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यकर्ता मिळाव्यात जाहीर केले होते. 

त्यानुसार काही पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला होता. दरम्यान सुमित खांबेकर यांच्याकडील शहराध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर त्यांच्यावर राज ठाकरे कोणती नवीन जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सुमित खांबेकर यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिले जाऊ शकते अशी देखील चर्चा बऱ्याच दिवसांपासून मनसेच्या वर्तुळात होती. आज मुंबईत कृष्णकुंजवर राज ठाकरे यांनी सुमित खांबेकर यांची मनसेच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र दिले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमित खांबेकर यांच्यावर ही मोठी जबाबदारी असल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com