केंद्रीय मंत्री अनंत गीतेंपेक्षा जिल्हा परिषद सदस्याचे काम चांगले  : सुनील तटकरे

sunil_tatkare
sunil_tatkare

रायगड :  केंद्रीय मंत्री   खासदार अनंत गीतेंनी मतदारसंघात  काय विकास कामे केली  ?  हे एकदा तरी एका व्यासपीठावर एकत्र येऊन सांगावे," असे  खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे अनंत गीते यांना दिले आहे. 

म्हसळा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आणि   मांदाटने येथील  अंगणवाडी इमारत उदघाटन कार्यक्रम प्रसंगी मांदाटने येथे आयोजित सभेत बोलताना केले आहे.

श्री तटकरे म्हणाले ,"  गीते यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहेत . या कामांचा आलेख आम्ही जनते समोर मांडायला तयार आहोत .  ज्या गीतेंचा स्वतःवर विश्वास नाही त्यांच्यावर जनतेने काय विश्वास ठेवावा ?"  

" मी आता मंत्री नाही, आमदार नाही तरीही विकासकामे करण्यासाठी अनेक लोक माझ्याकडे निवेदने घेऊन येतात.  तसेच माझ्या सभांना होणारी गर्दी पाहून  असणारी गर्दी पाहून अनेकांच्या पोटात गोळा येतो.   आज लक्ष्मी पूजनचा शुभ दिवस असूनही सभेला भली मोठी गर्दी असल्याने माझ्यावर प्रेम करणारी जनताच माझी लक्ष्मी आहे," असही सुनिल तटकरे म्हणाले . 

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस अलिशेठ कौचाली, तालुका अध्यक्ष समिर बनकर, जिप सदस्य बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, माजी सभापती उज्वला सावंत, मधुकर गायकर, जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक इनामदार, शाहिद उकये, सरपंच अंकुश खडस, शांताराम गायकर, अनंत रिकामे, लहुशेठ म्हात्रे, डॉ.फरीद पठाण, सरपंच संगीता काते, सरपंच चंद्रकांत पवार, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक काते, श्रीपतशेठ मनवे, सुजित काते, विवेक ढवळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com