कामे नियमाप्रमाणे करा नाही तर सुरेश जैन, गुलाबराव देवकर व्हावे लागेल : सुरेश धस

 कामे नियमाप्रमाणे करा नाही तर सुरेश जैन, गुलाबराव देवकर व्हावे लागेल : सुरेश धस

पाटोदा (जि. बीड) : मोठ्या प्रमाणावर शहरी आणि ग्रामीण घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. घरकुलांची कामे नियमाप्रमाणे करा. नियमबाह्य सवलती दिल्यास सुरेश जैन, गुलाबराव देवकरव्हावं लागेल असे सांगत त्यांनी नियमांना बगल देण्याचा प्रयत्न केला तर काय गत होते, याची जाणीव आमदार सुरेश धस यांनी करुन दिली. रविवारी पाटोदा येथील कृष्ण मंदिरालगतच्या महादेव मंदिर भक्तनिवास बांधकामाचा प्रारंभ करताना त्यांनी सरकारी नियमांची जाणीव करुन दिली. 

येथील महादेव मंदिर भक्तनिवास, गांधनवाडी, बेलेवाडी, मंगेवाडी, गीतेवाडी, बामदळवाडी या गावांना जोडणारे जोडरस्ते अशा एकूण सुमारे अकरा कोटी रुपये खर्चाच्या कामांचाही शुभारंभ धसांच्या हस्ते करण्यात आला. शहरात केलेली आणि होणारी विकासकामं घरोघरी जाऊन नागरिकांच्या निदर्शनास आणून द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. पाणी शुध्दीकरण यंत्रणा, कचरा डेपोची जागा, नगरपंचायतच्या ताब्यात घ्यावयाच्या सरकारी कार्यालयाच्या जागा, नियोजित व्यापारी संकुल, शहर विकास आराखडा , घरकुल योजना आदी कामांच्या बाबतही त्यांनी उहापोह केला. 

विकास कामांच्या दर्जाबद्दल तडजोड केली जाणार नाही, नियमांना बगल दिली तर सुरेश जैन, गुलाबराव देवकर होतो अशी जाणिवही त्यांनी करुन दिली. गणेश नारायणकर, सय्यद अब्दुल्ला, राजाभाऊ देशमुख, महेंद्र गर्जे, बळीराम पोटे, शशिकांत भोसले, आनंद जाधव, सोमीनाथ कोल्हे, नानासाहेब डिडूळ, सतीश पाटील उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com