"आत्मक्‍लेश' भरकटवण्यासाठी  तुपकरांच्या राजीनाम्याच्या वावड्या 

"आत्मक्‍लेश' भरकटवण्यासाठी  तुपकरांच्या राजीनाम्याच्या वावड्या 

मुंबई ः शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि शेतमालाला रास्त भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आत्मक्‍लेश आंदोलन सुरू केले आहे. मात्र याच आंदोलना दरम्यान स्वाभिमानीचे युवा प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या फिरत आहेत. त्यामुळे रखरखत्या उन्हात तापलेले हे आंदोलन भरकटविण्याचा डाव असल्याचा संशय स्वाभिमानीचे नेते व्यक्त करीत आहेत. तर स्वाभिमानीतील फुटीर नेत्यांनी किंवा भाजपच्या नेत्यांनीच या वावड्या उठविल्याची चर्चा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. 

महात्मा फुले यांच्या पुण्यातील वाड्यापासून 22 तारखेला सुरू झालेले आत्मक्‍लेश आंदोलन 30 मे रोजी राजभवनावर धडकणार आहे. रखरखत्या उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनालाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील दुवा असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांनी राजीनामा दिल्याची बातमी अचानक पसरली. पनवेल पर्यंत पोहचलेल्या आत्मक्‍लेश यात्रेतील पदाधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्याच्या बातमीची कुजबुज सुरू झाली. ही गोष्ट लक्षात येताच तुपकर यांनी याचा खुलासा करत मी कुठल्याही प्रकरचा राजीनामा दिलेला नाही. मी वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष आहे असे ते म्हणाले . 

ही बातमी कुणी आणि का पसरवली असेल यावर स्वाभिमानीच्या नेत्यांना विचारले असता नाव न घेता भाजप किंवा स्वाभिमानीच्या फुटीर नेत्यांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या या लढ्यात कुणीही फूट पाडू शकत नाही. आणि असल्या राजीनाम्याच्या वावड्यांनी आंदोलनही भरकटनार नाही त्यामुळे वावड्या उठवणाऱ्यांनी आंदोलनाचा सामना करण्यास तयार राहण्याचा इशाराही स्वाभिमानीच्या नेत्यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com