पुणे : काल (ता.1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. त्यानंतर हा अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी (ता.2 फेब्रुवारी) देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) एक लाख ८० हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून सांगितला. मोदी यांनी दिलेला हा संदेश महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगाव पोहचवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी (Chandrakant Patil) सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी या देशव्यापी संवाद उपक्रमात सहभागी झाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, संजय कुटे, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस (मुख्यालय) अतुल वझे व प्रदेश चिटणीस संदीप लेले उपस्थित होते.
पाटील कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे हे सांगितले आहे. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे, असे विविध प्रस्ताव मोदीजींनी नेत्यांना समजून दिले आहेत. याबरोबरच क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही मोदीजींनी समजून दिले. आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगाव पोहोचवतील, अशी माहिती पाटलांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.