उद्धव ठाकरे, अजित पवार यांची त्या पाच जणांकडून फसवणूक : चेडे

शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या या टोळीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीतपवार तसेच आमदार निलेश लंके यांची दिशाभूल करण्यातअसल्याचाही आरोप या वेळी चेडे व भालेकर यांनी केला.
1Ajit_20Pawar_20Uddhav_20Thackeray_20New.jpg
1Ajit_20Pawar_20Uddhav_20Thackeray_20New.jpg

पारनेर : विधानसभा निवडणुकीत विजय औटी पराभूत झाल्यानंतर नुकतेच पक्षांतर केलेल्या पाच कर्तव्यशून्य नगरसेवकांना औटी वाईट दिसू लागले. निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे, औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत, असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झालेल्या या पाच नगरसेवकांना आपली निवडून येण्याची कुवत नाही, हे समजल्याने त्यांनी केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलाचे नाटक केले, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक व नगरसेवकपती अर्जुन भालेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या या टोळीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच आमदार निलेश लंके यांची दिशाभूल करण्यात असल्याचाही आरोप या वेळी चेडे व भालेकर यांनी केला.

औटी यांच्याबरोबर या पाच नगरसेवकांनी सुमारे साडेचार वर्ष नगर पंचायतीत काम केले. त्यावेळी यांना शहराचा विकास व्हावा, असे वाटले नाही का. औटी पराभूत झाल्यानंतरच यांना शहराचा विकास का आठवला. गेल्या साडेचार वर्षात यांनी शहराच्या पाणी प्रश्नाबाबत मासिक बैठकित किती वेळा आवाज उठविला किंवा त्यासाठी हे सत्तेत होते, मग त्यांनी काय प्रयत्न केले, याचीही माहिती जनतेला द्यावी. त्या नगरसेवकांनी स्वतःच सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे, असे आव्हान चेडे व भालेकर यांनी या वेळी केले.

आडीच वर्षांपूर्वी निवडलेले नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी देण्यात आलेला उमेदवार योग्य नव्हता. त्यामुळेच आम्ही शिवसेनेपासून फारकत घेतली व सत्तांतर झाले. असे हे आता सांगत आहेत, हे कितपत योग्य आहे व खरे आहे, हे आता त्यांच्या भुमिकेवरून दिसून येत आहे. सत्तांतरानंतर आज या नगरसेवकांना विकास दिसू लागला आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात किती विकास केला, हे जनतेला आता दाखवून द्यावे, असे आवाहन या वेळी केले.

याउलट आता सत्तांतर झाल्यानंतर नगरपंचायतीने कोट्यावधी रूपयांची कामे केली आहेत. त्यात प्रामुख्याने विविध प्रभागातील रस्ते, भाजी मार्केट, मटण मार्केट, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, दिड कोटी रूपये खर्चाचे पथदिवे, 760 घरकुले आदी कामे आम्ही मार्गी लावली आहेत. या विकास कामात या नगरसेवकांचे योगदान काय आहे, याचेही त्यांनी आत्मपरीक्षण करावे. नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी आपल्या प्रभागात किती विकास केला, असा थेट प्रश्नही उपस्थित करून ते त्यांनी जनतेला सांगावा, असेही अवाहन केले.

जे नगरपंचायतीच्या बैठकांना कधी वेळेवर उपस्थित राहिले नाहीत, एखादया विकास कामाचा पाठपुरावा करण्याचे धाडस ज्यांनी दाखविले नाही. पाणी योजना सोडा, स्वतःच्या प्रभागातील विकास कामांसाठी त्यांनी काय योगदान दिले, हे एकदा जनतेसमोर सांगावेच. पाणी योजनेसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या वल्गना करणाऱ्या देशमुख यांनी स्वतःच्या प्रभागात किती विकास केला, असा सवाल चेडे व भालेकर यांनी केला. आगामी नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा सक्षम पर्याय देण्यासाठी शहरातील जनतेशी चर्चा करणार असल्याचेही शेवटी ते म्हणाले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com