अशोक चव्हाणांनी का मानले अजित पवार यांचे आभार..

एक चांगला व वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प मांडल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनास पात्र आहेत. यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात कुठेही बडेजाव, पोकळ घोषणा नाहीत.
Minister Ashok Chavan Thanks To Ajit Pawar News
Minister Ashok Chavan Thanks To Ajit Pawar News

औरंगाबाद ः महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात मांडलेल्या अर्थसकंल्पावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षाने तर हा रडगाणे गाणारा, मुंबई महापालिकेचा, आमच्या जुन्या योजना नव्याने सांगणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे.

पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र अजित पवारांचे आभार मानले आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महार्गाला नांदेड-जालन्याला जोडल्याबद्दल हे आभार मानण्यात आले आहेत.

विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका होत असली तरी अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प आणि तो मांडणारे अर्थमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. अशोक चव्हाण म्हणाले. कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेे आहेत. केंद्राचे भरीव सहकार्य तर सोडाच पण राज्याच्या हिस्स्याचे पैसेही वेळेवर मिळत नाही.

या परिस्थितीतही एक चांगला व वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प मांडल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनास पात्र आहेत. यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात कुठेही बडेजाव, पोकळ घोषणा नाहीत. परिस्थितीनुरूप आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शेतकरी, महिला तसेच इतर गरजू घटक व क्षेत्रांसाठी आवश्यक त्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व विभागांना व घटकांना न्याय देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या ७ हजार कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असलेल्या नांदेड-जालना महामार्गाची घोषणा केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानतो, असेही चव्हाण यांनी आपलल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com