जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला...

जिल्हा परिषदेचे एकूण ५३ मतदारसंघ (सर्कल) आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ जागा आहेत. परंतु आता ओबीसीच्या १४ जागासुद्धा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या आहेत.
ZP Cartoon
ZP Cartoon

अकोला : जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या Zillha Parishad and Panchayat Samiti ४२ जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. the bye election programe has been announced त्याअंतर्गत १९ जुलै रोजी मतदान तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर इच्छुक उमेदवार १९ जूनपासून ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील.

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मार्च २०२१ मध्ये अकोला जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितीच्या २८ जागांवर गंडांतर आले होते. तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतींसह उपसभापतींनासुद्धा त्यांचे पद गमवावे लागले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रिक्त जागांसाठी महिला आरक्षणसुद्धा काढण्यात आले होते. परंतु नंतरच्या काळात राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

२२ जागा महिलांसाठी राखीव
जिल्हा परिषदेचे एकूण ५३ मतदारसंघ (सर्कल) आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ जागा आहेत. परंतु आता ओबीसीच्या १४ जागासुद्धा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या आहेत. त्यांपैकी सात जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यासोबतच सातही पंचायत समित्यांच्या रिक्त झालेल्या २८ जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार असून त्यांपैकी १५ जागा महिलांसाठी राखीव राहतील.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
- निवडणुकीच्या तारखांची सूचना व कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध करण्याची तारीख - २९ जून २०२१
- संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्वीकारण्याचा कालावधी - २९ जून ते ५ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३)
- नामनिर्देशन पत्रांची छाननी व त्यावर निर्णय देणे - मंगळवार ६ जुलै (सकाळी ११ वाजतापासून)
- वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - मंगळवार ६ जुलै (छाननीनंतर लगेच)
- नामनिर्देशन पत्राविरोधात जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करणे - शुक्रवार ९ जुलै
- जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख - सोमवार १२ जुलै
- जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - सोमवार १२ जुलै
- उमेदवारी मागे घेणे (जेथे अपील नाही तेथे) - सोमवार १२ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेदवारी मागे घेणे (जेथे अपील आहे तेथे) - बुधवार १४ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप (अपील नाही तेथे)- सोमवार १२ जुलै (दुपारी ३.३० नंतर)
- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप (जेथे अपील आहे तेथे) - बुधवार १४ जुलै (दुपारी ३.३० नंतर)
- मतदानाची तारीख - सोमवार १९ जुलै २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत)
- मतमोजणीची तारीख - मंगळवार २० जुलै (सकाळी १० पासून)
- निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे - शुक्रवार २३ जुलैपर्यंत

जि.प.च्या या गटांमध्ये निवडणूक
दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेडा, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा, शिर्ला.

पं.स.च्या या गणांमध्ये निवडणूक
हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपूरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानपूर, आलेगाव.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com