आजचा वाढदिवस : राहूल मोटे, आमदार परांडा (राष्ट्रवादी काँग्रेस) 

परांडा-भूम-वाशी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहूल मोटे यांचा आज (ता. २४) वाढदिवस.
MLA Rahul Mote
MLA Rahul Mote
Published on
Updated on

परांडा:  परांडा-भूम-वाशी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहूल मोटे यांचा आज (ता. २४) वाढदिवस. माजी आमदार स्व. महारूद्र मोटे यांच्या आकस्मिक निधनामुळे राहूल मोटे कमी वयातच राजकारणात सक्रीय झाले. राहूल यांचे मामा माजीमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. 

२००४ मधील विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम राहूल मोटे यांना परांडा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून २००९ आणि २०१४  असे सलग तीन वेळा  ते परांडा मतदारसंघातून  विजयी झालेआहेत . त्यांनी गोदावरी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद भूषविलेले आहे .  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, पंचायत राज समितीचे सदस्य, बाणगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com