नव्या शहराध्यक्षावरून राष्ट्रवादीचा निष्ठावंत गट नाराज; पक्षात फूट पडण्याची शक्यता

अद्याप याबाबत पक्षाकडून कोणतीच ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Bhiwandi NCP is dissatisfied on the New city president
Bhiwandi NCP is dissatisfied on the New city president

भिवंडी  ः काँग्रेस पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले शोएब गुड्डू खान यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते व नगरसेवक तीव्र नाराज झाले आहेत. शोएब खान यांना तातडीने अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे आणि पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जावेद फारूकी यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर, ज्येष्ठ नगरसेवक अहमद सिद्दिकी यांच्यासह अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली आहे. मात्र, अद्याप याबाबत पक्षाकडून कोणतीच ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Bhiwandi NCP is dissatisfied on the New city president)

भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून भगवान टावरे, ज्येष्ठ कार्यकर्ते जावेद फारूकी हे काम पाहत असतानाच गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालेले शोएब खान यांची अवघ्या चोवीस तासांत भिवंडी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पक्षात काम करणारे बहुतांश राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते व नगरसेवक नाराज झाले आहेत. 

दरम्यान पक्षाच्या निष्ठावंतांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची काल भेट घेऊन शोएब खान यांना तातडीने पदावरुन दूर करावे, अशी मागणी केल्याची माहिती माजी उपमहापौर तथा नगरसेवक अहमद सिद्दिकी यांनी दिली. पक्षात सक्रियपणे काम करणारे जावेद फारूकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगितले 

दरम्यान, शोएब खान यांच्या शहराध्यक्षपदावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लवकरच भेटणार आहेत, असेही सिद्दीकी यांनी नमूद केले. राष्ट्रवादीने अचानकपणे शहराध्यक्षपद बदलल्याने पक्षातील सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com