बॅाम्ब ठेवल्याची फोनवरून धमकी; मंत्रालय पिंजून काढलं

नियंत्रण कक्षात दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास फोन आला होता.
Threatening phone call of bomb in mantralay mumbai
Threatening phone call of bomb in mantralay mumbai

मुंबई : मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निवावी फोन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिस लगेच कामाला लागले. बॅाम्बशोधक पथकांसह इतर पथके मंत्रालयात दाखल झाले असून जोरदार मंत्रालय पिंजून काढलं आहे. स्फोटकं शोधण्यासाठी श्वान पथकाचाही वापर करण्यात आला. (Threatening phone call of bomb in mantralay mumbai )

मुंबईतील मंत्रालयामध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहे. या कक्षात दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याची धमका या फोनवरील व्यक्तीने दिली. त्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. मंत्रालयाच्या सुरक्षाव्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात आली. मंत्रालयात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. बॅाम्बशोधक पथक, श्वान पथकांसह पोलिसांनी पथकं घटनास्थळी दाखल झाली. वेगाने शोधमोहिम केल्यानंतरही हाती काहीच लागलं नाही. अखेर ही अफवा असल्याचे स्पष्ट झालं. पण तोपर्यंत संपूर्ण पोलिस प्रशासन हादरून गेलं होतं.

धमकी देणारा मनोरुग्ण

बॅाम्ब ठेवल्याची धमकी देणारा तरूण मनोरुग्ण असल्याचे तपासात समोर आलं आहे. सागर काशिनाथ मंद्रे असे त्याचे नाव असून तो नागपूरमधील बोरीनगर येथे राहणारा आहे. सागरने यापूर्वीही 12 फेब्रुवारी 2020 रोजी महसून विभागाच्या सचिवांना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

त्याचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज रविवार असल्याने मंत्रालय रिकामं होतं. अधिकारी-कर्मचारी तसेच मंत्री नसल्याने धावपळ उडाली नाही. कामाच्या दिवशी हा फोन आला असता तर मोठा गोंधळ उडाला असता.

राज्याच्या प्रशासकीय कामाचे प्रमुख केंद्रस्थान असलेल्या मंत्रालयामध्ये अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मंत्रालयात काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्था नेहमीच चोख ठेवली जाते. मंत्रालयात एकदा मोठी आगही लागली होती. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com