राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचले  

आज काल राजकारण जातीपातीवरचसुरु आहे.
 Raj Thackeray .jpg
Raj Thackeray .jpg

पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातींबद्दल तिरस्कार वाढला असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी (ता. ५ सप्टेंबर) पुन्हा राष्ट्रवादीवर (NCP) जादीवाचा आरोप करत आपल्या कार्यकर्त्यांना जाती-पातीच्या राजकारणा पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. (Raj Thackeray criticis of NCP) 

 Raj Thackeray .jpg
धमक्यांना जनताच उत्तर देईल ; राऊतांना मोहितेंनी सुनावलं..

मनसेच्या नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक नवी पेठेतील ज्ञानल मंगल कार्यालयात ठाकरे यांनी घेतली. त्यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले, १९९९ पूर्वी प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल तिरस्कार वाढला आहे. आज काल राजकारण त्यावरच सुरु आहे. अशा दूषित वातावारणापासून तुम्ही सावध रहा. आपल्या पक्षात जातपात चालणार नाही. पक्षात जात बघून पदे दिले जात नाही. या जातीपातीची चर्चा सुद्धा पक्षात करू नका, असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.  

फ्लेक्सवर गॉगल लावलेला फोटो बघून तुमच्याबद्दल लोकांमध्ये प्रेम वाढत नाही तर तिरस्कार वाढतो हे लक्षात घ्या. फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांकडे गेलो की आपल्या समस्या सुटतात, कामे होतोच असा विश्‍वास लोकांच्या मनात निर्माण करा. निवडणूका येतात आणि जातात, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना किती वर्ष निवडणुका हारत होते. अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे निवडणुकांचा विचार न करता काम करा, असे ते म्हणाले. 

शाखा अध्यक्ष हे पद मनसे पक्षसंघटनेत सर्वात महत्त्वाचे आहे. फ्लेक्सवर गॉगल घातलेला फोटो टाकणे हे शाखा अध्यक्षांचे काम नाही. लोकांमध्ये जा, तुमचा जनसंपर्क वाढवा. समस्या घेऊन गेल्यानंतर त्या सुटतातच असा विश्‍वास निर्माण करा. नागरिकांना वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग, बुके पाठवा, त्यातून आपुलकी निर्माण होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

 भाजप शिवसेनाला सत्तेत येण्यासाठी किती वर्ष लागली याचा विचार करा. ९९ वेळा प्रयत्न केल्यानंतर १०० वा दगड बरोबर लागतो. तसेच निवडणुकीचे आहे. आपल्याला प्रयत्न करत राहावे लागणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कोकणात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वात चांगले काम केले, याचे अभिनंदन ठाकरे यांनी केले, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com