कबड्डीच्या मैदानातही खासदार बाळू धानोरकर अव्वल...;पाहा व्हिडिओ

नागपूर- निवडणुकीच्या मैदानात दिग्गजांना ‘बाद’ करणारे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानातही तेवढ्या स्फूर्तीने उतरतात. (Maharashtra Congress MP Balu Dhanorkar playing Kabaddi) यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे न्यू फ्रेन्ड्स क्रिडा मंडळातर्फे त्यांचा सत्कार जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर करण्यात आला. यावेळी स्वतः खेळाडू असलेल्या धानोरकरांना मैदानात उतरण्याचा मोह आवरला नाही. अन् देवाळा संघाविरुद्ध एन्ट्री टाकून ‘कबड्डी.. कबड्डी.. कबड्डी...’ करीत त्यांनी एका मिनीटातच एक खेळाडू बाद केला आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com