महेश कोठेंच्या ‘राधाश्री’वर जयंतरावांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची हजेरी; पण पुतण्याच गायब!

राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे ‘राधाश्री’चे राजकीय वर्तुळ रुंदवाले आहे.
jayant patil-mahesh kothe
jayant patil-mahesh kothesarkarnama

सोलापूर : सुशील रसिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय फड रंगात असतानाच तिकडे महेश कोठे यांचे निवासस्थान असलेल्या ‘राधाश्री’वर एखाद्या विवाह सोहळ्याप्रमाणे घाई सुरू होती. व्ही. के. बहुउद्देशीय सभागृहात भोजनाची व्यवस्था केली होती. ‘मंत्र्यांच्या भोजना'त कोठेही काही कमी पडू नये, याची दक्षता कोठेसमर्थक घेत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्यासह जिल्हाभरातील महत्त्वाच्या नेत्यांनी महेश कोठे (mahesh kothe) यांच्या निवासस्थानी हजेरी लावली आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे ‘राधाश्री’चे राजकीय वर्तुळ रुंदवाले. मात्र, कोठे यांचे पुतणे नगरसेवक देवेंद्र कोठे यांची गैरहजेरी ठळकपणे जाणवली. तसेच राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मनोहर सपाटे हेही कार्यक्रमास आले नव्हते. (Attendance of all NCP leaders including Jayant Patil at Mahesh Kothe's 'Radhashree' bungalow)

सुशील रसिक सभागृहात जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा ताफा महेश कोठे यांच्या ‘राधाश्री’ निवासस्थानाकडे वळला. घरकुल व पूर्व भागातील नगरसेवकांसह अनेक मान्यवर येथे मंत्री पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.

jayant patil-mahesh kothe
मी बाबूराव पाटलांचा मुलगा आहे, शेंडी तुटेल पण शब्द मोडणार नाही!

पाटील यांच्या समवेत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक सुरेश घुले, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, माजी अध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर यू. एन. बेरिया, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पंढरपूरचे कल्याणराव काळे, नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले बिज्जू प्रधाने यांच्यासह शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

jayant patil-mahesh kothe
त्यानंतर मोहोळचा कारभार कुणाकडेही द्या; त्यास माझी हरकत नाही : राजन पाटील

राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीमुळे महापालिका निवडणुकीतील समीकरणे वेगळी असू शकतात, अशीही चर्चा या वेळी रंगली होती. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘राधाश्री’चे महत्त्व आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

jayant patil-mahesh kothe
राष्ट्रवादीचे मंत्री, आमदारांच्या डोक्यातून फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद जाईना; भरणेंनंतर मानेंकडूनही उल्लेख

या कार्यक्रमास माजी महापौर नलिनी चंदेले, शशिकांत कैंची, विद्या लोलगे, इब्राहिम कुरेशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गुंड, सरचिटणीस ज्योत्स्ना पाटील, दीपाली पांढरे, शफी इनामदार, माजी नगरसेवक माशाळकर, पीर अहमद शेख उपस्थित होते.

jayant patil-mahesh kothe
अजितदादांच्या कानात काहीतरी सांगून राष्ट्रवादी कशी वाढणार : जयंतरावांचा रोखठोक सवाल

बरडे पोचले पण सपाटेंची गैरहजेरी!

महाविकास आघाडीचा धर्म पाळून आणि महेश कोठे यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी कोठे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागतही केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील प्रमुख नेते माजी महापौर मनोहर सपाटे व महेश कोठे यांचे पुतणे नगरसेवक देवेंद्र कोठे यांची अनुपस्थिती लक्षणीय होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com