Dinvishesh 22 October 2024 : श्रीगणेशा भारताच्या चांद्रयान मोहिमेचा

Dinvishesh 22 October: पृथ्वीची कक्षा भेदत विश्वाला गवसणी घालण्याच्या भारताच्या स्वप्नांना या यशस्वी उड्डाणाने एक आत्मविश्वास मिळवून दिला.
Dinvishesh 6th October 2024
Dinvishesh 6th October 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Dinvishesh: भारताने १४ जुलै २०२३ रोजी अवकाशात आपल्या चांद्रयान मोहिमेअंतर्गत तिसरे प्रक्षेपण केले आणि विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून एक विक्रम केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळयान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला. साऱ्या जगाने हा क्षण अनुभवला. प्रत्येक भारतीयाची छाती या ऐतिहासिक घटनेमुळे रुंदावली.

याला खरी सुरुवात झाली ती आजच्या दिवशी २००८ साली. २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताचे चांद्रयान -१ अवकाशात झेपावले होते. पृथ्वीची कक्षा भेदत विश्वाला गवसणी घालण्याच्या भारताच्या स्वप्नांना या यशस्वी उड्डाणाने एक आत्मविश्वास मिळवून दिला.

आदल्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चांद्रयान १ अवकाशात झेपावले आणि त्या वेळी भारतीयांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला.

२२ ऑक्टोबरच्या त्या ऐतिहासिक दिवशी काळी सहा वाजून २२ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्राच्या लाँचपॅडवरुन 'पीएसएलव्ही ११' न चांद्रयानासह अवकाशात यशस्वी झेप घेतली होती. त्यानंतर २५ मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या भोवतीची २५५ बाय २२ हजार ८६६ किलोमीटर्सची प्राथमिक कक्षा गाठून चांद्र प्रवासाला सुरुवात केली आणि भारताच्या अंतराळ गवसणीच्या प्रवासाने एक टप्पा गाठला.

आता भारताला प्रतिक्षा आहे ती चांद्रयान ४ मोहिमेची...लवकरच ती सुद्धा यशस्वी पार पडेल यात शंका नाही.

Dinvishesh 22 October 2024
Dinvishesh 22 October 2024Sarkarnama
Dinvishesh 6th October 2024
Parivartan Mahashkti : कोल्हापुरात परिवर्तन महाशक्ती राजकीय धमाका करणार, हादरा महायुती की ‘मविआ’ला कुणाला बसणार?

दिनविशेष - 22 ऑक्‍टोबर

1789 : पेशवाईतील प्रामाणिक, निःपक्षपाती, निर्लोभी आणि निर्भीड न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विश्वनाथ प्रभुणे. पुणे दरबारात 1751 मध्ये शास्त्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. थोरले माधवराव हे पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते.

1933 : थोर देशभक्त व केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते थोरले बंधू होत.

1938 : चेस्टर एफ. कार्लसन या अमेरिकी संशोधकाद्वारा मजकुराची पहिली झेरॉक्‍स प्रत काढण्यात यश.

1963 : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

Dinvishesh 6th October 2024
Sandeep Naik : नवी मुंबईतील नाईक परिवारात फूट? तर भाजपला खिंडार; संदीप नाईक याचं 'तुतारी' घेण्याचं ठरलं

1994 : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल "कोट ऑफ आर्म्स' पुरस्कार जाहीर.

2000 : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

२००३ : मूळचे भारतीय, परंतु अमेरिकेत वास्तव्यास असलेले अभियंते हरेन एस. गांधी यांना ‘नॅशनल मेडल ऑफ टेक्‍नॉलॉजी’ हे अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाणारे पारितोषिक जाहीर.

२०१५ : आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या अमरावतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com