मुंबईतील रस्त्यावर रिक्षातून फिरताना दिसले सदाभाऊ!

मुंबापुरीत कामानिमित्त रिक्षातून प्रवास करण्याचा एक आगळाच आनंद आहे. हे शहर लोकांवर माया करणारं आहे. तशीच इथली माणसं!
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

मुंबई : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे एक दिलखुलास व्यक्तीमत्व. बोलायला उभे राहिल्यानंतर भल्याभल्यांचे वस्त्रहरण करणारा हा शेतातला रांगडा गडी. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याबरोबर शेतकरी संघटना वाढवलेल्या खोत यांनी मंत्रीपदापर्यंत पोचल्यानंतरसुद्धा आपला साधेपणा कायम जपला आहे. त्याचीच प्रचिती आज (ता. ११ एप्रिल) मुंबईतील रिक्षावाल्याला अनुभवता आली. माजी आमदार खोत यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला आणि मुंबापुरीत रिक्षातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. (Former Minister of State Sadabhau Khot traveled by rickshaw in Mumbai)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या सदाभाऊंचा राजकीय प्रवास राज्यमंत्रीपदापर्यंत पोचला. मात्र, तिथपर्यंत पोचपर्यंत त्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या. आपल्या भाषणाच्या माध्यमातून ते अनेकदा व्यक्तही होत असतात. त्याच सदाभाऊंचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाल १५ दिवसांपूर्वीच संपला आहे. इच्छुकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना काही काळ विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे सदाभाऊ पुन्हा बांधवर दिसल्यास नवल नाही.

काही वर्षे राज्यमंत्री आणि सहा वर्षे आमदार राहिलेल्या सदाभाऊ खोत यांनी आता राज्यभर फिरून शेतकरी प्रश्‍नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे आणि पुन्हा एकदा संघटना बांधण्याचे ठरवले आहे. त्यासाठीची तयारी त्यांनी पुन्हा चालवली आहे.

Sadabhau Khot
पंतप्रधान मोदींना पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर

मुंबईतील प्रवासाबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबापुरीत कामानिमित्त रिक्षातून प्रवास करण्याचा एक आगळाच आनंद आहे. हे शहर लोकांवर माया करणारं आहे. तशीच इथली माणसं! कुठल्याही शहरातले रिक्षावाल्यांचे माझ्याशी नक्की नातं काय, हा प्रश्न मला अजून सुटलेला नाही. मी प्रवासाचा आनंद घेतो. माझ्याकडे गाडी नसते, त्यावेळी मी रिक्षा, टॅक्सीने प्रवास करतो. खूप प्रामाणिक आहेत मुंबईचे रिक्षावाले. इतक्या वर्षात कधीच वाईट अनुभव आलेला नाही. सुरुवातीच्या दिवसात अनेक कार्यक्रमांसाठी शेअर ए रिक्षा किंवा आमच्याकडचे वडाप वापरायचे. आजच्या प्रवासाने त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com