Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) (Ajit Pawar) गुलाबी रंगाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अख्ख्या महाराष्ट्राला या गुलाबी रंगाचे कोडे पडले आहे. विशेष म्हणजे ‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही याचा उलगडा होत नाही.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तर पक्षाच्या या नव्या टीमचे नावच ‘पिंकी’ असे ठेवले आहे. गुलाबी रंगाची आयडिया देणाऱ्या ‘डिझाईन बॉक्स’ या कंपनीच्या ‘टीम’ला ‘पिंकी’ या नावानेच अन्य कर्मचारी बोलत असतात.
या ‘डिझाईन बॉक्स’ला सर्व मतदार संघातील सर्वेक्षण करण्याचे काम दिले आहे. त्यानुसार प्रत्येक मतदार संघात ‘मॅनेजर’ नेमण्याचे काम सुरू आहे. गंमत म्हणजे या एजन्सीला ‘मॅनेजर’ पदासाठी सुयोग्य उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळे अखेर काही ठिकाणी तर ‘ड्रायव्हर’चे काम करणाऱ्या उमेदवारांना ‘मॅनेजर’ पदावर नेमण्याचे काम सुरू आहे.
यातही गंमत म्हणजे या ‘मॅनेजर’ला या एजन्सीने गणवेश सक्तीचा केला आहे. त्याचा रंगही गुलाबीच असणार असल्याचे कळते. म्हणजे गुलाबी रंगाचा गणवेश काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयीन कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा केला नाही म्हणजे मिळवली.
अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५ हे आवर्जून घ्यावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.