Modi Government 3.0 : दिल्लीमध्ये कोकण, मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार?

Lok Sabha Election Result News : 2014 व 2019 सालच्या दोन्ही मंत्रिमंडळात मराठवाडा, कोकणाला स्थान देण्यात आले होते. मात्र, यावेळेस प्रथमच राज्यातील मराठवाडा, कोकणाला स्थान मिळाले नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
Bhagvat Karad, Raoshaeb Danve, Narayan Rane
Bhagvat Karad, Raoshaeb Danve, Narayan RaneSarkarnama

Modi cabinet 2024 : देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेचा सोपान राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदी यांच्यासोबत अनेक नेते मंत्रिपदाचीही शपथ घेणार आहेत. मात्र, यावेळेस पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मराठवाडा, कोकणाला स्थान देण्यात आलेले नाही. यापूर्वीच्या 2014 व 2019 सालच्या दोन्ही मंत्रिमंडळात मराठवाडा, कोकणाला स्थान देण्यात आले होते. मात्र, यावेळेस प्रथमच राज्यातील मराठवाडा, कोकणाला स्थान मिळाले नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांत नाराजी आहे.

केंद्रात पीएम मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत 50 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रिपदे आले आहेत. रविवारी दुपारपर्यंत मंत्रिपदासाठी दिल्लीतील भाजपच्या (BJp) नेतृत्त्वाकडून अनेकांना फोन गेले आहेत. दुसरीकडे गेल्या वेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले मंत्री नारायण राणे आणि मराठवाड्यातील मंत्री भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान मिळणार नसल्याचे समजते.

या दोघांना शपथविधीसाठी फोन आला नसल्याचे समजते. त्यामुळे आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता मंत्रिपदाच्या यादीतून कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

2014 साली पीएम मोदी यांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस मराठवाड्यातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. शपथ घेतल्यानंतर आठ दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यावेळेसच कोकणातून अनंत गीते यांची वर्णी लागली होती.

2019 साली सलग दुसऱ्यांदा पीएम मोदी यांनी शपथ घेतली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्यातून कॅबिनेट मंत्रीपदी रावसाहेब दानवे यांची वर्णी लागली तर कालांतराने कोकणातून नारायण राणे यांची कॅबिनेट तर मराठवाड्यातील डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती.

मंत्रिमंडळात मराठवाडा, कोकणाला स्थान नाही

2024 साली पीएम मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत असताना केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाडा, कोकणाला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com