Fadnavis Pen Drive : चव्हाणांना घड्याळच भेट द्यायचे, हे तेजस मोरेने ओळखले होते..

Ad Pravin Chavan यांचे या घड्याळाच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन झाल्याचा संशय
Tejas More
Tejas Moresarkarnama

जळगाव : सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात स्टींग ऑपरेशन करणारा तेजस मोरे (Tejas More) हा जळगावातील जिल्हा परिषद कॉलनीतील मुळ रहिवासी असून सध्या तो पुण्यात बांधकाम व्यवसायिक असल्याचे सांगण्यात येत आाहे. जळगावात त्याच्याविरूध्द एक खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.

राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका गुन्ह्यात अडकवून मोक्का लावण्याबाबत सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी रचनलेल्या षडयंत्राबाबत चे पुरावे पेन ड्राईव्ह च्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात सादर केले, त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली, त्यानंतर सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी याबाबत खुलासा करतांना एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत सांगितले, होते कि आपला एक आशील जळगाव येथील तेजस मोरे यांने आपल्याला भिंतीवरील घडयाळ भेट दिले, त्यात कॅमेरा बसवून स्टींग ऑपरेशन केले असावे असा आपला अंदाज आहे. तेजस मोरे यांना एका गुन्हायात अटक झाल्याने त्याला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर तो नेहमी आपल्याकडे येत असे. आपल्याला अनेक वस्तु भेट देण्याची ऑफर दिली होती. मात्र ती आपण नाकारली होती. मात्र त्यांने एक भिंतीवरील घडयाळ भेट देवून आपल्या कार्यालयात बसविल्यवाचेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्या नावाचा खुलासा केल्याने तो कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

तेजस मोरे जळगावाचा असल्याचा उल्लेख सरकारी वकिल चव्हाण यांनी केल्याने जळगावात माहिती घेतली असती, तेजस मोरे हा जळगाव येथील जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी आहे, त्याचे वडिल जिल्हा परिषदेत अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. तेजसचे शिक्षण जळगावातच झाले आहे, तो बांधकाम व्यवसायिक असून तो सध्या पुण्यात व्यवसाय करीत आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो पुण्यात राहत असून जळगावातील त्याचे घर बंदच असते.

तेजसवर गुन्हा

विशेष म्हणजे या तेजसवर जळगाव शहर पोलिस ठाणे २०१९ मध्ये रोजी खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी माध्यमांशी माहिती देतांना सांगितले, कि खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती तसेच या गुन्ह्याची दोषारोपपत्रही जळगाव जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com