पंकजा मुंडेनी पाच वर्षात काय केले ? - अजित पवार

 पंकजा मुंडेनी पाच वर्षात काय केले ? - अजित पवार

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी उपोषण केलं मात्र मागील पाच वर्ष राज्यात केंद्रात दोन्ही ठिकाणी त्यांचं सरकार होतं तेव्हा पाण्यासाठी का काही केलं नाही असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा यांच्या लाक्षणिक उपोषणा संदर्भात उपस्थित केला. त्यांच माझ्याकडे कुठलेही निवेदन आलं नाही. त्यांच्या सरकारच्या काळात काम केली असती तर पंकजा ताईंना उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती असेही ते म्हणाले. 


अजित पवार यांनी आज मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची बैठक घेतली. काही पालकमंत्री आज बैठकीला आले मात्र काहींना शक्‍य झालं नाही. त्यांनी कालच भेट घेऊन माहिती दिली. मराठवाडयासाठी 9 हजार कोटी रुपये आधी दिले जात होते. आता 9 हजार 500 कोटी रुपये दिले. जास्ती पैसे द्यायचे होते, मात्र शेतकरी कर्ज माफीमुळे शक्‍य होणार नाही. 31 मार्च आधी ती कर्जमाफी द्यायची आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात तो जमा केला जाणार आहे. 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी देखील काही तरी मदत देण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. ते आपला अहवाल देणार आहे. नियमित कर्ज परत करणाऱ्यांना देखील काही प्रमाणात मदत देण्याबाबत विचार सुरू आहे त्याच नियोजन नव्या आर्थिक वर्षात केलं जाणार आहे. 

घाटी रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मदत केली जाईल, महानगर पालिकेच्या रस्त्यात आलेले विजेचे खांब हलवणे असतील त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही. मोडकळीस आलेल्या शाळांना मदत करण्याबाबत योजना केल्या. औरंगाबाद शहरातील तीन पुलांसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात उपाय योजना करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com