बारामती : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील `गोविंदबाग`या बंगल्यासमोर मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आज ठिय्या धरला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. अजित पवारांनीही एक मराठा...लाख मराठा, अशा घोषणा देत आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला.
बारामतीत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन गेले काही दिवस सुरू होते. शरद पवार यांच्याही घरासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी साडेनऊ वाजता आंदोलक गोविंदबागेसमोर जमले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास अजित पवार हे तेथे पोचले. त्यांना रस्त्यावर खाली बसत आंदोलनात सहभागी झाले.
त्यांनंतर त्यांनी हातात माईक घेतला. मराठा आंदोलकांच्या घोषणाही त्यांनी दिल्या. एक मराठा..लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी नारेबाजी त्यांनी केली. आंदोलकांनी दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.