आणि दानवेंनी झापले "भावी पालकमंत्री' म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला...

आणि दानवेंनी झापले "भावी पालकमंत्री' म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला...

औरंगाबाद : उत्साहाच्या भरात अंबादास दानवे यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी चांगलेच झापले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळाल्यावर अंबादास दानवे मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचा जयघोष कार्यकर्ते करत असतांना एकाने अंबादास दानवे यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख करत घोषणा दिली. पण कार्यकर्त्याचा हा आगाऊपणा त्यांना रूचला नाही आणि त्यांनी त्याला तिथेच सुनावले. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे अंबादास दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय होणार याचा अंदाज शिवसैनिकांना आला होता. त्यामुळे चिकलठाणा येथील मतमोजणी केंद्राबाहेर सकाळी आठ वाजेपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मतमोजणीनंतर साधरणता तासाभरात निकाल स्पष्ट झाला आणि बोहर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरूवात झाली. 

सर्वसामान्य शिवसैनिकांच्या परिश्रमामुळेच आपला विजय साकार होत असल्याची जाणीव अंबादास दानवे यांना असल्यामुळे बोहर ताटकळत बसलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते प्रवेशद्वारावर गेले. अनेकांचे हातात घेत कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार केल्या. घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला होता. अशा उत्साही वातावरणात एका कार्यकर्त्यांने अंबादास दानवे यांच्यावरील प्रेमापोटी "भावी पालकमंत्री अंबादास दानवेंचा विजय असो' अशी घोषणा दिली. यावर अंबादास दानवे यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याला तिथेच सुनावले. 

अंबादास दानवे यांच्या विजयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. निवडणुकीची संपुर्ण यंत्रणा त्यांनीच राबवली होती. त्याचा परिपाक म्हणून अंबादास दानवे यांचा हा विक्रमी विजय समजला जातो. अशावेळी भावी पालकमंत्री असा कार्यकर्त्याकडून झालेला उल्लेख दानवे यांना खटकला आणि त्याने पुन्हा अशी चूक करू नये याची खबरदारी घेत जागेवरच कार्यकर्त्याला शांत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com