शिवसेनाप्रमुख म्हणाले, लक्षात ठेवा पक्ष आणि संघटना हीच सर्वात मोठी...

शिवसेनाप्रमुख म्हणाले, लक्षात ठेवा पक्ष आणि संघटना हीच सर्वात मोठी...

औरंगाबाद : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तडकफडक स्वभाव अख्या महाराष्ट्राला माहित आहे, काहीही विचारायचे असले तर अगदी भिडभाड न ठेवता बिनधास्त विचारण्याची त्यांची पध्दत. शहरप्रमुख निवडण्याची प्रकिया सुरू असतांना मी व सुहास दाशरथे मातोश्रीवर गेलो होता. साहेबांच्या खोलीत प्रवेश करतांच त्यांनी आमच्यावर जणू बॉम्बगोळा टाकावा असा प्रश्‍न टाकला " तुम्हे खैरेचे की रावतेंचे' थेट सवाल ऐकून आम्ही दोघेही चक्रावलो, सुहास शांतच बसला, पण मी हिंमत करून साहेब आम्ही दोघांचेही नाही, आम्ही तुमचे असे उत्तर दिले. त्यावर पुढे बाळासाहेबांनी जे उत्तर दिले तो प्रसंग माझ्या राजकीय जीवनातील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरला 

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन जोमाने वाढत होते, बाळासाहेबांचे देखील मुंबईहून येथील सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष असायचे. 1999 मध्ये शहप्रमुख निवडायचा असल्याने इच्छुकांना मुलाखतीसाठी मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. मी आणि सुहास दाशरथे दोघेही मुंबईला गेलो. बाळासाहेबांना भेटण्यासाठी आणि मुलाखतीसाठी मातोश्रीवर गेलो, साहेब आपल्या खोलीत बसलेले होते. आम्हाला आत पाठवण्याचा निरोप आला आणि साहेबांच्या समारे जाताच " तुम्ही कुणाच्या गटाचे रे, खैरेंच्या की रावतेंच्या' असा प्रश्‍न त्यांनी आम्हाला केला. 

साहेबांच्या या रोखठोक प्रश्‍नाने आमची भंबेरी उडाली. काय बोलावे काही सूचत नव्हते, सुहास तर गप्पच बसला. थोडा विचार करून मी साहेबांना म्हणाले, साहेब आम्ही कुणाचेही नाही, आम्ही फक्त तुमचे आहोत. तेव्हा साहेब म्हणाले, माझे कसे ? उद्या मी शिवसेनाप्रमुख राहिलो नाही, किंवा शिवसेना सोडून गेलो, तर तुम्ही पण शिवसेना सोडणार का? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी आम्हाला केला. त्यावर मी, आम्ही शिवसेना कदापी सोडणार नाही असे म्हणालो. 

माझ्या या उत्तराने साहेबांचे समाधान झाले, ते म्हणाले, राजकारणात गट-तट नसतात, पक्ष आणि संघटना हीच सर्वात मोठी असते. कुणाच्या येण्याने किंवा जाण्याने संघटनेला फरक पडत नसतो. तेव्हा कुणाच्या गटा-तटात राहू नका तर शिवसैनिक आणि शिवसेनेचे म्हणून राहा, तरच संघटना आणि तुम्हीही टिकाल असा मोलाचा संदेश बाळासाहेबांनी त्यावेळी दिला. बाळासाहेबांचा हा संदेश आणि उपदेश माझ्यासह हजारो, लाखो शिवसैनिकांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात देखील मोलाचा ठरला. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि संघटनेला अधिक महत्व दिले पाहिजे ही बाळासाहेबांची शिकवण माझ्या राजकीय वाटचालीत मला नेहमीच मोलाची ठरत आली आहे आणि ठरत राहील. 

शब्दांकन ः जगदीश पानसरे 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com