लातूर शहरातून अमित तर ग्रामीणमधून धीरज देशमुख इच्छूक

 लातूर शहरातून अमित तर ग्रामीणमधून धीरज देशमुख इच्छूक

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मंगळवारी पक्षाच्यावतीने मुलाखती घेण्यात आल्या. यात विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून आपण पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे सांगत मुलाखत दिली. त्यांचे लहान बंधू जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी मुलाखत दिली आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवू इच्छिणारे आमदार व पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी मात्र आजच्या मुलाखतीला दांडी मारली. 

पक्षाचे निरीक्षक माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॉंग्रेसभवनमध्ये या मुलाखती झाल्या. सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण मुलाखती दिल्या आहेत. लातूर शहर मतदार संघातून विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मागितली आहे. याच मतदारसंघासाठी ताजूद्दिेन वहेदअली सय्यद यांनीही मुलाखत दिली आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातून आमदार ऍड. त्र्यंबक भिसे आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुलाखत दिली आहे. तसेच या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख इच्छूक असून त्यांनीही आज मुलाखत दिली. तसेच या मतदारसंघात श्रीमती यासमिन अबदूलगणी शेख, रविकांत तांबारे हे ही इच्छूक आहेत. 

अहमदपूर विधानसभा मतदार संघासाठी रामचंद्र मद्दे, शंकर गुटे, डॉ. गणेश कदम यांनी मुलाखती दिल्या. उदगीर विधानसभा मतदार संघातून लोकसभा 
निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार राहिलेले मच्छिंद्र कामत यांनी अर्ज दाखल केला होता. पण त्यांनी मुलाखतीच्या वेळी मात्र दांडी मारली. यात जांबुवंत सोनकवडे, धर्मराज सोनकवडे, डॉ. शिवाजी जवळगेकर, मधुकर एकूरकेकर यांनी मुलाखती दिल्या. निलंगा विधानसभा मतदार संघातून अशोकराव पाटील निलंगेकर, पंडीत विठ्ठलराव धुमाळ, अभय साळूंखे, मुरलीधर जाधव यांनी मुलाखती दिल्या. 

औसा विधानसभा मतदार संघातून पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील मुरुमकर हे पुन्हा इच्छूक आहेत. पण आज त्यांनी मुलाखतीच्या वेळी दांडी मारली. या मतदारसंघातून श्रीशैल उटगे, विद्या पाटील, महादेव गोरे, नागनाथ पाटील हे इच्छूक आहेत. दुपारपर्यत या मुलाखती चालल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख उपस्थित होते. प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व श्री. कामंत यांनी आपण काही कारणामुळे मुलाखतीला उपस्थित राहू शकत नाही असा निरोप दिल्याची माहिती श्री. बेद्रे यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com