बाळासाहेब म्हणाले तू मला आदेश देतो का ?

पण तासाभरातच जे. जे. रुग्णालयात हालचाली सुरू झाल्या, माहिती घेतली तेव्हा असे समजले की तासाभरातच बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात येत आहेत .तेव्हा माझ्या लक्षात आले की बाळासाहेबांनी माझी फिरकी घेतली. काही वेळातच साहेब जे.जे. रुग्णालयातील आठव्या मजल्यावर आले,
बाळासाहेब म्हणाले तू मला आदेश देतो का ?

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाचे विविध पैलू वीस वर्ष त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे मला समजून घेता आले. शिवसेना-भाजप युती सरकार 1999 मध्ये सत्तेवर असतानाचा एक प्रसंग आजही मला आठवतो. आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी सुरेश नवले यांचा एक अपघात झाला होता .त्यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु होते. मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून नवले यांना भेटण्यासाठी बाळासाहेबांनी यावे असे मला वाटले. मी फोनवरून बाळासाहेबांना नवले यांच्या अपघाताची माहिती देऊन तुम्ही त्यांना भेटायला आलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर बाळासाहेब भडकले आणि मला म्हणाले तू मला आदेश देतो का ? बाळासाहेबांच्या या वाक्‍याने मी स्तब्ध झालो, पुढे मला काही सुचलेच नाही. बाळासाहेब रागावले म्हणजे ते येणार नाहीत असे मला वाटले. 

पण तासाभरातच जे. जे. रुग्णालयात हालचाली सुरू झाल्या, माहिती घेतली तेव्हा असे समजले की तासाभरातच बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात येत आहेत .तेव्हा माझ्या लक्षात आले की बाळासाहेबांनी माझी फिरकी घेतली. काही वेळातच साहेब जे.जे. रुग्णालयातील आठव्या मजल्यावर आले, त्यांनी सुरेश नवले यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बाळासाहेब येणार हे कळाल्यावर जे.जे.रुग्णालयातील आठही मजल्यावरचे बहुतांशी पेशंट हे हातात सलाईन घेऊन रुग्णालयातील गॅलरीमध्ये केवळ बाळासाहेबांना पाहण्यासाठी उभे असल्याचे चित्र तेव्हा मी बघितले. राज्यातील किंबहुना देशातील कुठल्याही नेत्याला बाळासाहेबांइतके प्रेम मिळाले नाही हे त्यांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून सांगायला मला अभिमान वाटतो. 

( शब्दांकन : जगदीश पानसरे )
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com