33 हजार रुद्राक्षांतून साकारले शिवसेनाप्रमुखांचे मोझॅक पोट्रेट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून मोझॅक पोट्रेक साकारून कलाकार चेतन राऊत यांनी त्यांना अनोखी मानवंदना दिली. हे शिवसेनाप्रमुखांचे जगातील सर्वांत मोठे पोट्रेट ठरले. ते बुधवारी दिवसभर दादर येथील शिवसेना भवनसमोर ठेवण्यात आले होते.
Thakre Portrait
Thakre Portrait

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून मोझॅक पोट्रेक साकारून कलाकार चेतन राऊत यांनी त्यांना अनोखी मानवंदना दिली. हे शिवसेनाप्रमुखांचे जगातील सर्वांत मोठे पोट्रेट ठरले. ते बुधवारी दिवसभर दादर येथील शिवसेना भवनसमोर ठेवण्यात आले होते.

या पोट्रेटची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. राऊत यांचा हा सातवा विश्‍वविक्रम आहे. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोझेक पोट्रेट तयार केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोट्रेटसाठी त्यांनी नेपाळवरून पंचमुखी रुद्राक्ष मागवले. त्यांनी 12 तासांत आठ फूट बाय आठ फुटांचे हे पोट्रेट साकारले. त्यात 13 रंगछटांचा वापर करण्यात आला.

या कलाकृतीबाबत चेतन म्हणाले, शिवसेनाप्रमुख आणि रुद्राक्षांचे अतूट नाते होते. त्यांना रुद्राक्षाच्या माध्यमातून मानवंदना द्यावी, असे मनात आले. या पोट्रेटसाठी एक लाखाचा खर्च आला असून, तो मी स्वतः केला आहे. पोट्रेटमध्ये वापरण्यात आलेली रुद्राक्ष नैसर्गिक आहेत. सर्व रुद्राक्षांचा आकार एकसारखा नव्हता. त्यामुळे पोट्रेट तयार करणे खूप आव्हानात्मक होते. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या सहकार्याने हे पोट्रेट शिवसेना भवनसमोर लागले. ते पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या कलेची दखल घ्यावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com