शिवसेनेतील प्रवेशाचे वृत्त खोटे, मी राष्ट्रवादीतच : भास्कर जाधव

.
bhaskar jadhav denies rumors
bhaskar jadhav denies rumors

गुहागर :  आमदार भास्कर जाधव मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटून आल्याचे वृत्त रविवारी दुपारपासून माध्यमांमध्ये पसरले, मात्र आपण कोणालाही भेटायला गेलो नव्हतो.

शिवसेनेत किंवा अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी विश्‍वास ठेवू नये, असा खुलासा आमदार भास्कर जाधव यांनी  केला.

लोकसभा निवडणुकीनंतर आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी सोडणार, अशा अफवांचे पीक आले होते, मात्र त्यावेळीही त्यांनी पक्षांतराचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. मध्यंतरी भाजपमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रवेश केला. त्यावेळीही ही कोकणातील एक नेता भाजप किंवा शिवसेना या पक्षात जाणार, अशी चर्चा होती.

आमदार भास्कर जाधव चिपळुणातून व जि. प. सदस्य विक्रांत जाधव गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

 मी कुठेही गेलेलो नाही. दिवसभर निवासस्थानी विश्रांती घेत होतो. माध्यमातून दाखविल्या जाणारे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com