नागपुरात भाजप नगरसेवकांचा असह'योग' 

खूप गाजावाजा करून नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा मोठ्या प्रमाणावर करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु, या मेगा ईव्हेंटकडे भाजपच्याच नगरसेवकांनीच पाठ फिरवली. शहरातील 108 नगरसेवकांपैकी केवळ 5 नगरसेवकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
नागपुरात भाजप नगरसेवकांचा असह'योग' 

नागपूर : खूप गाजावाजा करून नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा मोठ्या प्रमाणावर करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु, या मेगा ईव्हेंटकडे भाजपच्याच नगरसेवकांनीच पाठ फिरवली. शहरातील 108 नगरसेवकांपैकी केवळ 5 नगरसेवकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. सध्या 'संपर्क फॉर समर्थन' मोहिम सुरू आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचा उपयोग केला जाणार होता. या कार्यक्रमासाठी शहरातील 16 संस्थांना सुद्धा सोबत घेतले होते. यासाठी नागपुरातील यशवंत स्टेडीयममध्ये 20 हजार लोकांना एकाचवेळी योगासने करता येईल, अशी व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, अशीही जाहिरात करण्यात आली होती. परंतु केंद्रीय मंत्री गडकरी परदेशात गेल्याने या मेगा ईव्हेंटची जबाबदारी स्थानिक नेत्यांवरच आली. महापौर नंदा जिचकार यांनाही विदेशवारीचा 'योग'. त्यामुळे त्याही नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकारही उपस्थित राहणार नसल्याने नगरसेवकांचाही उत्साह कमी झाल्याचे आजच्या कार्यक्रमावरून दिसून आले. यशवंत स्टेडीयम येथे झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला दीड-दोन हजार लोक उपस्थित होते. भाजपचे केवळ 5 नगरसेवकांनी हजेरी लावली. नागपूर महापालिकेत भाजपचे 108 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनीही असहयोग पुकारल्याने कार्यक्रम आयोजकांची चांगलीच अडचण झाली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, नगरसेवक प्रवीण दटके यांनी प्रामुख्याने योग दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. लोकांची उपस्थिती पाहून उपमहापौर पार्डीकर व माजी महापौर प्रवीण दटके यांनी लवकरच काढता पाय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com