"बीआरएसपी'कडून बसप काऊंटर 

"बीआरएसपी'कडून बसप काऊंटर 

मुंबई ः वर्षभरापूर्वी बहुजन समाज पार्टीतून फुटून वेगळा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने (बीएआरएसपी)आपले पाळेमुळे खोलपर्यंत रुजविण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरात विविध समाज घटकांना एकत्र करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. 

महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या पक्ष-संघटनांना आलेल्या अपयशाची उणीव भरून काढणे आणि बसपला काउंटर करून नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी राज्यभरात कॅडरकॅम्पचा धुमाकूळ घातला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बीआरएसपीला अनेक ठिकाणी आपली चांगली मते मिळविण्यास यश आले. चंद्रपूर महानगरपालिकेत 1 जागा जिंकली असली तर पाच जागांवर पार्टीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तर बाजूच्या बल्लारशहाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाविरोधात बीआरएसपीच्या उमेदवारांने कडवी झुंज देत साडेबारा हजार मते मिळवली. अंबेजोगाई, पूर्णा आदी ठिकाणी पक्षाला खाते खोलता आले नसले तरी अनेक ठिकाणी बीआरसएसपीचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर आल्याने सत्ताधारी आणि आंबेडकरी पक्ष व विशेषतः बसपनेही मोठा धसका घेतला आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीत बीआरएसपीने पहिल्यांदाच निवडणुकीत 27 उमेदवार उभे केले होते तर पुणे-12, नागपूर-52 आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत 15 उमेदवार उतरवले होते. परंतु या तिनही महापालिकेत पार्टीला खाते खोलता आले नसले तरी मतांची टक्‍केवारी चांगली असल्याने या सर्वच ठिकाणी बीआरएसपीने आपली ताकद वाढविण्यासाठी ठिकठिकाणी कॅडरकॅम्पचे आयोजन केले आहे. 

बीआरएसपी तिसरा पर्याय : माने 
"बीआरएसपीकडून प्रत्येक जिल्ह्यापासून ते तालुकास्तवरापर्यंत या कॅडरकॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 2019 मध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात तिसरा पर्याय केवळ बीआरएसपी देऊ शकेल असे आमचे नियोजन आहे. यासाठी सर्व राज्यभरात तयारी सुरू आहे', अशी प्रतिक्रिया बीआरएसपीचे प्रमुख डॉ. सुरेश माने यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com