सहा हत्तींवरून काढा माझी मिरवणूक- चंद्रकांत दादांचा सतेज पाटिलांना टोला

कोल्हापूर शहरात आणि जिल्हयात आपण मंत्री झाल्यापासून आजपावेतो तब्बल सहा हजार कोटी विकासकामांसाठी आणले आहेत.त्यामुळे सतेज पाटील यांनी एका नव्हे तर सहा हत्तींवरून आपली मिरवणूक काढावी.-चंद्रकांतदादा पाटील
dada-Vs-Bunty
dada-Vs-Bunty

मुंबई  :  " कोल्हापूर शहरात आणि जिल्हयात आपण मंत्री झाल्यापासून आजपावेतो तब्बल सहा हजार कोटी विकासकामांसाठी आणले आहेत.त्यामुळे सतेज पाटील यांनी एका नव्हे तर सहा हत्तींवरून आपली मिरवणूक काढावी.जनतेच्या भल्यासाठी करता आलेल्या या सेवेबददल आपण अत्यंत विनयपूर्वक या मिरवणुकीचा स्वीकार करू," असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी मारला आहे.

कोल्हापूरसाठी 500 कोटी आणले तरी आपण शहरात दादांची ह्त्तीवरून निवडणूक काढू असा टोमणा कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी मारला होता.त्यांचे हे विधान सरकारनामावर चर्चेचा विषय झाले होते.हे प्रकरण भलतेच गाजणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. चंद्रकातदादांनी आपण यासंबंधी एकाच नव्हे तर सहा हत्तींवर बसण्यास पात्र झालो आहोत असे सांगितले.

ते म्हणाले ," मी तीन हजार कोटींची विक्रमी कामे केली.शक्‍य असेल तेथून सर्व विभागांसाठी शब्द टाकला.महानागरपालिकेचा चेहरा पालटावा यासाठी प्रयत्न केले.महाराष्ट्रात रस्तेबांधणीची कामे हाती घेतली आहेत अन पश्‍चिम महाराष्ट्राकडे विशेष लक्ष पुरवले आहे.आजवर जी कामे झाली ,तसेच जो निधी मंजूर झाला तो तीन हजार कोटींचा आहे.500 कोटींसाठी एक मिरवणूक असे पाटील म्हणतात,त्यामुळे आता सहा हत्ती आणावे लागतील."

गेले काही दिवस पाटील विरूध्द पाटील असे आरोपप्रत्यारोप जोरात सुरू आहेत.चंद्रकांतदादा त्याकडे लक्ष वेधत म्हणाले  " मी अत्यंत प्र्रतिकूल परिस्थितीतून समाजकारणात सक्रीय झालो.आता राजकारणात आहे.असे उल्लेख करणेही गरजेचे नसते. कारण जनता सर्व जाणते. मी सतत जनतेत रहाणारा कार्यकर्ता आहे.शालिनी पॅलेस कुणाचा वगैरे प्रश्‍न हे वैफल्यातून उपस्थित झाले आहेत. "

"प्रत्येक निवडणुकीत भाजपचा पराभव होणार  असा प्रचार हे करतात  .. मतपेटीतून नागरिक पुन्हा आम्हाला पसंती देतात अन विरोधक पुन:पुन्हा बेछूट आरोप करतात.त्यांना येणारे नैराश्‍य आम्ही समजू शकतो. कसेही आरोप झाले तरी जनता सत्य जाणते त्यामुळे आम्हाला पुन्हा निवडून देते.आजरा सारख्या जागा आम्ही जिंकल्यामुळे आता कॉंग्रैस राष्ट्रवादी कॉंग्रेस दोहोत अस्वस्थता पसरली आहे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com