आज 'मातोश्री' खेकड्याने झुकवली...!

जुलैमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्‍यामधील तिवरे धरण फुटले होते. तेव्हा राज्याचे जलसंधारणमंत्री सावंत यांनी या धरणाला खेकड्यामुळे भगदाड पडल्याचा दावा केला होता.
आज 'मातोश्री' खेकड्याने झुकवली...!

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने व करमाळा मतदारसंघातून रश्‍मी बागल यांना शिवसेनेनी उमेदवारी दिल्याने जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांना नेटिजन्सकडून टार्गेट करण्यात आले आहे. 

सावंत यांचे नाव न घेता सोशल मिडीयावर 'खेकड्यांचा सुळसुळाट' सुरु झाला आहे. "आज मातोश्री खेकड्याने झुकवली...', "सावधान करमाळकरांनो तालुका पोखरुन देऊ नका' अशा मजकुराच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. 

सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातून महापालिकेचे विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ऐनवेळी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्याबरोबर करमाळ्यातही आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. मात्र तेथेही राष्ट्रवादीतून आलेल्या रश्‍मी बागल यांना शिवसेनेनी उमेदवारी दिली आहे. याला जलसंधारणमंत्री सावंतच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जलसंधारणमंत्री सावंत यांना  नेटिजन्सनी सोशल मिडीयावर टार्गेट केले आहे.

त्यामध्ये 'शेवटी खेकड्याने धरण फोडलेच...', "आज मातोश्री खेकड्याने झुकवली.., आम्ही मावळे नारायणसेनेचे आबा तुमची मान सदैव ताठ ठेवणार..', "शेवटी सेनेते त्यांची दाखवून दिली... तिकीट कशावर देतात...', "खेकड्याने धरण फोडलेत ऐकुन होतो आम्ही, पण त्याच खेकड्याने मातोश्री फोडली. अहो आश्‍चर्य म ऐकावे ते नवलच', "खेकडा बुडणार महाराष्ट्र भिकारी बनवणार' अशा मजकुराच्या पोस्ट फिरत आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com