सत्ता मिळाली म्हणून धनगर आरक्षणाचा  लढा थांबवू नका, मेटेंचा जानकरांना सल्ला 

सत्ता मिळाली म्हणून धनगर आरक्षणाचा  लढा थांबवू नका, मेटेंचा जानकरांना सल्ला 

मुंबई : सरकार, सत्ता आणि मंत्रिपद हे कायम राहत नाही, मात्र तुम्ही जर समाज आणि विचारापासून फारकत घेऊ नका, आणि सत्ता मिळाली म्हणून धनगरांच्या आरक्षणाचा लढा थांबवू नका अशी सूचनाही शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी महादेव जानकर यांना आज केली. अहल्याबाई होळकर यांच्या 292 व्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मेटे यांच्यासह खासदार अरविंद सावंतही आले आणि भाषण देऊन निघून गेले. 

मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि भाजपचे सरचिटणीस आमदार सुजित सिंह ठाकूर आले आणि मध्येच भाषण ठोकून निघून गेले. 

मेटे-सावंताच्या भाषणानंतर पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाल्याचे चित्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज पहावयास मिळाले.

 
सभागृहात रासपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. खासदार सावंत यांनी आपल्या भाषणात धनगडचा धनगर केल्याशिवाय आपण शांत राहणार नसल्याची ग्वाही दिली. तर सरकारनेही धनगर आणि शेतकऱ्यांना विसरू नये असा सरकारला सल्ला देत आपले भाषण संपविले. त्याच दरम्यान सभागृहात मेटे यांचा प्रवेश झाला. सावंत यांच्या भाषणानंतर पुन्हा सुरु झालेला सांस्कृतिक कार्यक्रममध्येच थांबवून मेटे यांचे भाषण सुरू करण्यात आले. 

मेटे यांनी अहल्याबाई होळकर यांची जयंती असा उल्लेख करण्याऐवजी त्यांची पुण्यतिथी असल्याचा उल्लेख केला मात्र सभागृहातील उपस्थितानी मेटे यांना त्यांची चूक लक्ष्यात आणून दिली. त्यावर मेटे यांनी सारवासारव करत आपली चूक लगेच मान्य केली. मेटे पुढे म्हणाले की , आपण सर्व महापुरुषांना काही जातीच्या चौकटीत सीमित करत आहोत, म्हणून ठराविक जातीतील लोक काही महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करत असून ही प्रथा मोडून काढण्यासाठी आपण पुढील वर्षी अहिल्याबाई होळकर यांची जयंती शिव संग्राम कडून साजरी करू असे जाहीर केले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com