आयुक्त डॉ. रामास्वामींची नवी मुंबईत दबंगगिरी

आयुक्त डॉ. रामास्वामींची  नवी मुंबईत दबंगगिरी

नवी मुंबई : तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या डॉ. रामास्वामी यांनी महिन्याभरानंतर सुरू केलेल्या दबंगगिरीने झोपडपट्टी माफियांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यांनी अतिक्रमण केलेल्या झोपड्या हटविण्याचा धडाका सुरू केला आहे. 

रामास्वामी मुंढेंच्या जागी आल्यानंतर नवी मुंबईकरांनी त्यांच्याविषयी अपेक्षा बाळगल्या होत्या. त्यातच त्यांच्या बदलीच्या चर्चेचे महिनाभर गुऱ्हाळ रंगले. या कालावधीत अतिक्रमणे वाढली. पण आता डॉ. रामास्वामींने अतिक्रमण केलेल्या झोपड्या हटविण्याचा धडाका सुरू केला आहे. 
मुंढे यांची बदली झाल्यावर नवी मुंबईतील गावठाणात पुन्हा बांधकामे सुरू झाली. पदपथावर फेरीवाले आले, गॅरेजवाले रस्त्यावर आले. त्यामुळे मुंढे गेले, डॉ. रामास्वामी करतात काय अशी चर्चा नवी मुंबईत सोशल मिडीयावर व्हायरल व्हायला लागली. त्यातच डॉ. रामास्वामी हे बदलीसाठी प्रयत्नशील असून औरंगाबादेतील सिडकोच्या एका अधिकाऱ्याला नवी मुंबईत आणले जाणार असल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात सुरू झाली. 

मुंढेंच्या बदलीचा गैरफायदा अतिक्रमण माफियांनी घेतल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर आळविला जावू लागला होता. तथापि नवी मुंबईतील अतिक्रमणाचा आढावा संबंधित विभागाकडून घेत आयुक्त डॉ. रामास्वामींनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दोनच दिवसापूर्वी नंतरच्या ऐरोली विभागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एम.आय.डी.सी. सह संयुक्त कारवाई करीत चिंचपाडा, शंकरनगर भागातील हून अधिक अनधिकृत पक्की बांधकामे तसेच पत्र्याची बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोठी कारवाई केली. काही दिवसापूर्वीच सारसोळे गावातील एका अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. 

नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या अतिक्रमणाचा अहवाल अतिक्रमण विभागाकडून घेतला असून कारवाईचे आदेशही दिले आहेत. अतिक्रमणांवर कारवाई अटळ असल्याची टीप झोपडपट्टी माफियांना तसेच गावठाणात बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना अतिक्रमण विभागातील बिभिषणांकडून मिळाल्याने झोपडपट्टी माफिया तसेच गावठाणातील बांधकामे करणारे बिल्डर तणावाखाली वावरू लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com