देशाला पवार साहेबांकडून अपेक्षा असल्याने त्यांना निवडणुकीचा आग्रह : अजितदादा

देशाला पवार साहेबांकडून अपेक्षा असल्याने त्यांना निवडणुकीचा आग्रह : अजितदादा

माळेगाव : भाजप सरकारमुळे देशातील शेतकरी आणि जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आता विशेषतः शेतकऱ्यांना पवारसाहेबांकडून खूपच अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. साहेबांनी जरी याआगोदर निवडणूक लढविणार नसल्याचे जाहिर केले असले, तरी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीतील सर्वच नेतेमंडळीसह विविध स्तरातून निवडणूल लढविण्यासाठी आग्रह आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माढ्यातून शरद पवार यांनी उभे राहावे यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. पवार साहेबांची देशाला गरज आहे. त्यामुळे या आग्रहाचा विचार ते नक्की करतील, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

माळेगाव-पणदरे (ता.बारामती) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. रोहिणी रविराज तावरे, सभापती संजय भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था आदी मंजूर झालेल्या कोठ्यावधी रुपायांचे विकास कामांचे भूमिपुजन, तसेच वैयक्तिक व सार्जनिक लाभाच्या वस्तूचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते आज माळेगावात झाले. त्यावेळी पवार बोलत होते.

ते म्हणाले, ``देशातील सर्व प्रमुख विरोधक, धर्मनिरपेक्ष व समविचारी पक्षाचे नेते मंडळी पवारसाहेबांच्या दिल्ली येथील निवासस्थानी एकत्र येतात आणि भारतीय जनता पार्टीच्या हुकूमशाही सरकारविरोधी सक्षम पर्याय उभा करण्यासाठी ठोसपणे भूमिका मांडतात. त्यामध्ये काॅग्रेस पक्षाचे प्रमुख राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, चंद्रबाबू नायडू, माजी पंतप्रधान देवेगौडा, फारूक अब्दुल्ला यांच्या सारख्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याचाच अर्थ आता पवारसाहेबांना लोकभावनेचा विचार करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर करावी लागेल.``

शिवसेना ही भाजपला दररोज जरी शिव्या घालत असली, तरी ऐनवेळी त्या पेक्षांमध्ये युती होणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या आगोदर म्हणजे ८ मार्चला गुजरातमध्ये पंतप्रधान मोदीसाहेबांनी मेट्रोचे उद्धाटन ठेवलेले आहे. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे,`` असा अंदाज  पवार यांनी वक्त केला. 

दीडशे मुलींचे चेहरे फुलले...
माळेगाव-पणदरे गटातील सुमारे दीडशे शाळकरी मुलींना सायकली मोफत देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहिर केले. त्याच क्षणी उपस्थित मुलींनी एकच वादा अजितदादा..अशा घोषणा देत पवार यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. याप्रसंगी संबंधित मुलीचे चेहरे फुलून गेले होते. यावेळी १२ भजनी मंडळांना साहित्य वाटप केले, तसेच १८० लाभार्थींना शेळी गट,  कडबाकुटी यंत्र २८, सोलर वाॅटर हिटर १६, विद्युत मोटारी ३० लाभार्थींना देण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com