तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार हस्तक्षेप योजना  पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती 

बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष आलेल्या तुरीची नोंद, टोकन किंवा उपलब्ध असलेल्या माहितीवरून शेतकऱ्यांची अंतिम यादी समितीकडून केली जाणार असून ती जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्यांच्या मान्यतेनुसार त्या केंद्रावरील तुरीची खरेदी करण्यात येणार आहे
तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार हस्तक्षेप योजना  पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती 

मुंबई: राज्यात सध्या खरेदी करण्यात न आलेल्या तुरीची खरेदी करताना शेतक-यांना कोणताही तोटा होउ नये, यासाठी राज्य सरकारकडून राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येणार असल्याची पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारीमंत्रालयात दिली. 


या योजनेअंतर्गत तूर खरेदी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर या नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलेल्या संस्थांकडे सोपविण्यात आली असून खरेदी केंद्रावरील शिल्लक असलेल्या तुरीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तालुक्‍याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सहायक निबंधक, सहकारी संस्था, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यवस्थापक, सबएजंट संस्था तसेच पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ प्रतिनिधी, यांची समिती गठीत करण्यात आली आली असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. 

22 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष आलेल्या तुरीची नोंद, टोकन किंवा उपलब्ध असलेल्या माहितीवरून शेतकऱ्यांची अंतिम यादी समितीकडून केली जाणार असून ती जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्यांच्या मान्यतेनुसार त्या केंद्रावरील तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीच्या समन्वयाची जबाबदारी पणन संचालक, पुणे यांच्याकडे देण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, त्यावरील पीक पेरा पाहणीप्रमाणे तुरीची नोंद आहे का याची खात्री करुन, पीक पेऱ्यानुसार व कृषी विभागाने निश्‍चित केलेल्या हेक्‍टरी उत्पादनानुसार शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्राशी जोडलेले, संलग्न क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील तूर किंवा परराज्यातून आवक झालेल्या, व्यापाऱ्यांनी खरेदीला आणलेल्या तुरीसाठी ही योजना लागू राहणार नाही.

या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या तुरीच्या चुकाऱ्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या नांवे 7/12 चा उतारा आहे, त्यांच्या आधारकार्डशी संलग्न असलेल्या बॅंक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने एनईएफटी/आरटीजीएसद्वारे देण्यात येणार आहे.

या खरेदीसाठी राज्य पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बारदानाचा सर्वप्रथम वापर करावा व आवश्‍यकता भासल्यास बारदाना ई-निविदेद्वारे पणन महासंघाने,विदर्भ पणन महासंघाने उपलब्ध करुन घ्यावा, असे आदेश देण्यात आले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com