हिंगोली लोकसभेसाठी बाबूराव कदम यांची लॉबिंग

 हिंगोली लोकसभेसाठी बाबूराव कदम यांची लॉबिंग

हदगाव : लोकसभा निवडणुकीला आता 20 महिन्यांचाच अवधी राहिला असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांचे नाव हिंगोलीसाठी पुढे येत आहे. त्यादृष्टीने त्यांचे लॉबिंग सुरू केले आहे. मतदारसंघाचा ते दौराही करत आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका, विवाह सोहळे आणि अन्य कार्यक्रमांना ते हजेरी लावत असून संपर्क वाढविला आहे. 

मनमिळावू, निव्यर्सनी आणि स्वच्छ प्रतिमेचा निष्ठावंत नेता म्हणून कदम पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या नेहमी संपर्कात असतात. कोहळी येथील शाखाप्रमुख, नंतर सतत दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद असा त्यांचा प्रवास आहे. 2009 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली. 60 हजारांच्या आसपास मतदान घेतले.

विरोधी पक्षांच्या नेत्यांसह, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध, कोणावर विनाकारण टीकाटिपण्णी नाही, कोणाच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे वक्तव्य नाही, त्यामुळे सर्वच पक्षात त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

जिल्हाप्रमुख म्हणून हदगाव, हिमायतनगरसह किनवट, माहूर, मुदखेड, अर्धापूर, भोकर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेकडून प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव आतापासूनच घेतले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून मतदारसंघातील दौरे वाढविले आहेत.

विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून ते कार्यकर्त्यांसोबतच जनतेशी संवाद ठेवून या भागातील समस्या समजून घेत आहेत. 
कुठलीही निवडणूक लढवण्याची तयारी 
पक्षाने जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिल्याने ती पार पाडत आहोत. शिवसैनिक हा केंद्रबिंदू मानून कार्य करत आहे. मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी असल्याचे सतत दोनवेळच्या लोकसभा निवडणुकीनंतर सिद्ध झाले. आपण ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरवात केली.

पक्षाने मानसन्मान देवून जिल्हाप्रमुख केले, याचा आपल्याला अभिमान आहे. ही सर्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे. कुठलीही निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे असे बाबूराव कदम कोहळीकर यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com