शिवसेना सत्तेत सहभागी आहे ना ?याची रोज खात्री करून घेतो - अमित शहांचा टोला  

शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले आहे ,अशी नावे सुचवण्याचा कुणालाही अधिकार आहे मात्र अदयाप कोणत्याही नावावर शिक्‍कामोर्तब झालेले नाही .- अमित शहा
AMIT-SHAHA-
AMIT-SHAHA-

मुंबई :  शिवसेना केंद्रात आणि सत्तेत आमच्यासमवेत आहे,त्यांच्या नेत्यांची वक्‍तव्ये मी रोज वाचतो ,ऐकतो आणि दररोज सयंकाळी ते सरकारमध्ये आहेत काय याची खात्री करुन घेतो असे उदगार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज  बोलताना व्यकत केले.


भारताच्या दौऱ्यात मी ज्या राज्यात जातो तेथे एनडीएचा घटकपक्ष असलेल्यांना भेटतो, तसाच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.शिवसेना आमची मजबुरी नाही ,ते असे का वागतात हा प्रश्‍न त्यांना विचारा ,सहयोगी पक्षांना बरोबर घेवून जाणे ही आमची संस्कृती आहे उत्तरप्रदेशात आम्ही 33 पक्षांना संपूर्ण बहुमत असतानाही बरोबर घेतले आहे असेही त्यांन ीस्पष्ट केले.

उत्तम प्रशासनाने जनतेचे भले हेच आमचे धोरण आहे मात्र मागच्या पंधरा वर्षातील प्रश्‍न गंभीर असल्याने आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारची कामगिरी उत्तम असून पाच वर्षापर्यतं त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुढे जावू असेही ते म्हणाले.भाजपशासीत सरकारे त्या त्या राज्यात पुन्हा सत्तेत येतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 


महाराष्ट्र सरकार कर्जमाफीसाठी निधी उभारेल याचा आपल्याला विश्‍वास आहे .विकास हाच आमचा एक़मेव अजेंडा असून हिंदुत्ववादी मतांचे भाजप धृवीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.भाजपला मुस्लिम समुदायही आपला मानतो.येणारी गुजरात आणि हिमाचल निवडणुका लोकप्रियतेच्या जोरावर जिंकू ,बिहारच्या निवडणुकीनंतर पुरस्कारवापसी प्रकरण संपले याकडेही त्यांनी मिष्कीलपणे लक्ष वेधले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com