साठे महामंडळाच्या इंपोर्टेड गाड्या लिलावात 

महामंडळाचे अध्यक्ष असताना रमेश कदम यांनी 10 कोटी 13 लाख रूपये खर्च करून 64 इंपोर्टेड गाड्या खरेदी केल्या होत्या. या सर्व गाड्या रमेश कदम आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते वापरत होते. त्यामध्ये मर्सडिजबेंझ , ऑडी, इनोवा, स्कॉर्पिओ, महिंद्रा एक्‍सयुव्ही, स्विफ्ट डिझायर यासारख्या गाड्यांचा समावेश होता.
cars
cars

मुंबई:  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष रमेश कदम यांनी जवळच्या कार्यकर्त्यांना नियमबाह्यपध्दतीने इंपोर्टेड गाड्यांचे वाटप केले होते. त्यासर्व गाड्या जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया साठे महामंडळाने सुरू केली आहे. 


त्यातील काही गाड्या सीआयडीच्या ताब्यात आहेत तर काही लाभार्थ्यांच्या ताब्यात आहेत. या सर्व गाड्यांचे पुर्नमुल्यांकन करण्यासाठी परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आणि येत्या काही दिवसातच या 64 इंपोर्टेड गाड्यांचा लिलाव केला जाणार असल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महामंडळाचे अध्यक्ष असताना रमेश कदम यांनी 10 कोटी 13 लाख रूपये खर्च करून 64 इंपोर्टेड गाड्या खरेदी केल्या होत्या. या सर्व गाड्या रमेश कदम आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते वापरत होते. त्यामध्ये मर्सडिजबेंझ  , ऑडी, इनोवा, स्कॉर्पिओ, महिंद्रा एक्‍सयुव्ही, स्विफ्ट डिझायर यासारख्या गाड्यांचा समावेश होता.

 यातील काही गाड्या चौकशी दरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या आजूनही लाभार्थ्यांच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे बिगर मातंग समाजाच्या व्यक्तींनाही या गाड्याचा लाभ देण्यात आला आहे. सीआयडीने तपासा दरम्यान जप्त केलेल्या गाड्या महामंडळाडे सुपुर्द करण्याची मागणी महामंडळाने सीआयडीला केली आहे. 

महामंडळात झालेल्या गैरव्यवहारामुळे या सर्व गाड्या ताब्यात घेवून त्यांचे पुर्नमुंल्यांकन करून नव्याने लिलाव करण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे. त्याअनुशंगाने गाड्यांचे पुर्नमुल्यांकन करण्यासाठी महामंडळाने परिवहन विभागाशी पत्रव्यवहारही केला असल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

येणाऱ्या काळात या गाड्या ज्या विभागात वाटण्यात आल्या आहेत. त्या विभागातील परिवहन अधिकारी गाड्यांचे मुल्यांकन करतील आणि त्या गाड्यांचा सार्वजनिक स्वरूपात लिलाव केला जाईल असेही महामंडळाचे अधिकारी म्हणाले.

मात्र लिलावात गाडी घेणाऱ्या लाभार्थ्यांना सध्य स्थितीतील परिवहन विभागाने निश्‍चित केलेली गाडीची संपुर्ण किंमत एकाच वेळी भरावी लागणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com