" सीएए' ला विरोध करणे घटनाबाह्य - कपिल सिब्बल

" सीएए' ला विरोध करणे घटनाबाह्य - कपिल सिब्बल

कोझीकोडे : नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीला राज्यांनी विरोध करणे घटनाबाह्य आहे. राज्ये अशाप्रकारे विरोध करू शकत नाहीत, असे मत व्यक्त करून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे. 

एखादा कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतरदेखील त्याच्या अंमलबजावणीस राज्य सरकारांनी विरोध केला तर ते संपूर्णपणे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा कायदा लागू करू नये, म्हणून राज्ये केंद्र सरकारला विनंती करू शकतात. मात्र, आपल्या मर्जीने कायद्याला विरोध केल्यास देशात एक नवी समस्या निर्माण होऊ शकेल. राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) ही राष्ट्रीय लोकसंख्या वहीवरच अवलंबून (एनपीआर) आहे. त्यामुळे "एनपीआर' अमंलबजावणी स्थानिक रजिस्ट्रारच्या माध्यमातूनच करावी लागणार आहे. त्याची निवडदेखील एकत्रितपणे करावी लागले. त्यामुळे आमचे कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मदतच करणार नाहीत, अशी भूमिका राज्यांना घेता येणार नाही, असे सिब्बल यांनी सांगितले. नागरीकत्व कायद्यावरून देशभर सुरू असलेली आंदोलने ही नेते आणि सामान्य लोकांमधील युद्धासारखे, असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले. 

सिब्बल यांनीच पक्षाला घरचा आहेर दिल्याने कॉंग्रेसची अडचण झाली आहे. सिब्बल यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेस पक्षाची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. सिब्बल यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसची भूमिका केवळ विरोधासाठी विरोध आहे की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com