जमिनी नसणाऱ्यांकडून  महामार्गाचे राजकारण 

 जमिनी नसणाऱ्यांकडून  महामार्गाचे राजकारण 

ठाणे ः  शहापूर तालुक्‍यातील सुमारे 323 शेतकऱ्यांनी जमिनी देण्याचे संमतीपत्र दिले आहे. शेतकऱ्यांचे हित पाहण्याऐवजी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जमिनी नसलेले काही मोजके लोक राजकारण करीत आहेत, असा आरोप सार्वजनिक बांधकाम (एमएसआरडीसी) मंत्री एकनाथ शिंदे यांनी  येथे केला.

समृद्धी महामार्गासाठी नागपूरजवळच्या हिंगणापाठोपाठ शहापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची खरेदी खते तयार करून जमीनविक्रीची किंमत थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली. या खरेदी प्रक्रियेची सुरुवात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर उपस्थित होते.

केवळ प्रसारमाध्यमांतून आपण पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेत असल्याचे चित्र रंगविले जात होते; पण पक्षप्रमुखांनीच या विषयावर मत व्यक्त केल्याने हा विषय आता संपला आहे, असे  एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येत नसून मी स्वत: या खात्याचा मंत्री आणि अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांशी बोलत आहे. मी नागपूर येथेही शेतकऱ्यांना ते विक्रीबाबत समाधानी आहेत का, तसेच त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याबाबत सुरुवातीलाच खात्री केली. ठाण्यातही शेतकरी स्वखुशीने महामार्गाला जमीन देण्यासाठी पुढे येत असून त्यांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा होत आहेत का, याची मी खात्री करीत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com