पर्वतीत मिसाळ यांची घट्ट पकड, फक्त तिघांचे आव्हान

 पर्वतीत मिसाळ यांची घट्ट पकड, फक्त तिघांचे आव्हान

पुणे : पक्षाच्या शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघातून शहरात सर्वात कमी केवळ चार इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. आमदार मिसाळ यांच्याशिवाय पक्षाचे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, ज्येष्ठ नगरसेवक गोपाळ चिंतल व राजेंद्र शिळीमकर यांचा यात समावेश आहे. 

इच्छुकांची कमी संख्या हे आमदार मिसाळ यांची मतदारसंघावर असलेली पकड हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या इतर तीन जणांनी आमदारकीची इच्छा व्यक्त केली आहे त्यातील चिंतल व भिमाले हे पक्षाचे ज्येष्ठ नगरेसक आहेत. शिळीमकर यांचीदेखील नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. आमदार मिसाळ यांची पकड असली तरी पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो, अशी भावना या निमित्ताने कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शहरात सर्वाधिक नगरसेवक पर्वतीतून निवडून आले आहेत. 2014 ची लोकसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून मोठे मताधिक्‍य मिळाले होते. 

मतदारसंघातले इच्छुक 
माधुरी मिसाळ, गोपाळ चिंतल, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com